लॉकडाऊननंतर ‘पुण्यदशम्’ बस पुणेकरांच्या सेवेत; अवघ्या १० रूपयांत शहरात कुठेही फिरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 07:50 PM2021-05-20T19:50:08+5:302021-05-20T19:50:44+5:30

सर्वसामान्य नागरिकांना कमी दरामध्ये जास्त प्रवास करता यावा यादृष्टीने पहिल्या टप्प्यात ‘पुण्यदशम्’ बसेस शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच झोन एक मध्ये कार्यरत राहणार आहेत.

‘Punyadasham’ bus in public service after lockdown; Travel anywhere in the city for just 10 rupees | लॉकडाऊननंतर ‘पुण्यदशम्’ बस पुणेकरांच्या सेवेत; अवघ्या १० रूपयांत शहरात कुठेही फिरा

लॉकडाऊननंतर ‘पुण्यदशम्’ बस पुणेकरांच्या सेवेत; अवघ्या १० रूपयांत शहरात कुठेही फिरा

googlenewsNext

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात  ‘पुण्यदशम्’ या गुलाबी रंगाच्या ५० मिडी बस दाखल झाल्या असून, याव्दारे आता पुणेकरांना शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसभर दहा रूपयांमध्ये संचार करता येणार आहे. सार्वजनिक वाहतुक सक्षम करण्यासाठी महापालिकेकडून घोषणा करण्यात आल्याप्रमाणे, नव्या ३५० मिडी बसपैकी सीएनजीवरील या ५० मिडी बस पीएमपीएमएलच्या चाकण येथील वर्कशॉपमध्ये दाखल झाल्या आहेत. दहा रूपयांत शहराच्या मध्यवर्ती भागात प्रवास या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या योजनेचा शुभारंभ लॉकडाऊननंतर केला जाणार आहे. सदर बस खरेदीसाठी महापालिकेला १५ कोटी रूपये खर्च आला असून,आणखी ३०० बस खरेदीसाठी अंदाजपत्रकात तरतूद उपलब्ध आहे. 

सर्वसामान्य नागरिकांना कमी दरामध्ये जास्त प्रवास करता यावा यादृष्टीने पहिल्या टप्प्यात ‘पुण्यदशम्’ बसेस शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच झोन एक मध्ये कार्यरत राहणार आहेत.भविष्यात शहरात अन्य पाच झोनची आखणी करून प्रत्येक ठिकाणी ही दहा रूपयांमध्ये दिवसभर प्रवास ही सेवा देण्यात येणार आहे. देशात सार्वजनिक वाहतुक क्षेत्रातील हा पहिलाच प्रयोग पुण्यात राबविण्यात येत असून, त्याचा पुणेकरांना मोठा लाभ होईल असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला आहे.

  --------------------------

Web Title: ‘Punyadasham’ bus in public service after lockdown; Travel anywhere in the city for just 10 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.