""पुण्यकन्या"" ग्रंथ होतोय साकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:20 AM2020-12-03T04:20:46+5:302020-12-03T04:20:46+5:30

पुणे : पुण्याच्या नावलौकिकात भर टाकणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती शब्दबद्ध करणारा ग्रंथ साकार होत आहे. ऐतिहासिक पुण्यनगरीत जन्माला ...

'' '' Punyakanya '' '' Granth is coming true | ""पुण्यकन्या"" ग्रंथ होतोय साकार

""पुण्यकन्या"" ग्रंथ होतोय साकार

Next

पुणे : पुण्याच्या नावलौकिकात भर टाकणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती शब्दबद्ध करणारा ग्रंथ साकार होत आहे. ऐतिहासिक पुण्यनगरीत जन्माला आलेल्या आणि सद्यस्थितीत पुण्यात किंवा पुण्याबाहेर राहणाऱ्या, तसेच जन्माने पुणेकर नसलेल्या परंतु, गेल्या १० वर्षाहून अधिक काळ पुण्यात वास्तव्य असलेल्या तसेच कला, क्रीडा, साहित्य, संशोधन, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, राजकारण, संगीत, नाट्य, नृत्य, अभिनय , वृद्ध , पीडित, अनाथ आणि अपंग, गतिमंद, मतिमंदांची सेवा, अशा विविध क्षेत्रात वेगळी, भरीव, उल्लेखनीय आणि समाज उपयोगी कामगिरी करणाऱ्या महिला व मुली यांची माहिती शब्दबद्ध करून ‘पुण्यकन्या’या शीर्षका अंतर्गत ग्रंथरूपाने प्रकाशित होत आहे.

विविध क्षेत्रात उत्तमोत्तम कामगिरी करणाऱ्या अशा तरुणी आणि महिलांची माहिती व्यवस्थित मराठी भाषेत १५ दिवसांच्या आत पाठवावी. याकरिता प्रार्थना सदावर्ते ८५५२०६४०००/ ९३२२२६९५५१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे

Web Title: '' '' Punyakanya '' '' Granth is coming true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.