पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सत्तेचा वापर जनकल्याणासाठी केला - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 09:25 AM2024-07-19T09:25:57+5:302024-07-19T09:33:19+5:30
बारामती येथे शारदा प्रांगणात युवा नेते युगेंद्र पवार यांच्या पुढाकारातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव समितीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
बारामती - देशात अनेक कर्तृत्ववान महिला जन्माला आल्या.यामध्ये संकटावर मात करुन मिळालेली सत्ता रयतेचे राज्य म्हणुन चालविण्याचे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले.त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्याची चिंता न करता त्यांनी कर्तृत्व,शाैर्य दाखविले. मिळालेल्या सत्तेचा वापर देशातील जनकल्याणासाठी केला. देशाच्या कानाकोपर्यात बारव,विहीरी निर्माण करुन उपेक्षितांची तहान भागविली. सर्वसामान्यांच्या हाताला काम देण्यासाठी वस्त्रोद्योग उभारले.याचा आज अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यश्लोेक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गाैरव केला.
बारामती येथे शारदा प्रांगणात युवा नेते युगेंद्र पवार यांच्या पुढाकारातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव समितीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होते.पवार पुढे म्हणाले,देशात अनेक राजे होवून गेले. मात्र, गेल्या २०० ते ३०० वर्षांपासून सामान्यांच्या अंत:करणात ज्यांच्याविषयी आजहि आस`था आहे.त्यांनी सामान्यांचे राज्य प्रस`थापित केले.छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले.हा इतिहास आहे.अहिल्यादेवींच्या कार्यातून आजही नव्या पिढीला आजच्या कार्यक्रमातून मोठी प्रेरणा मिळेल.देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत धनगर समाजाचे मोठे योगदान आहे. या चळवळीत बारामतीच्या जगन्नाथ कोकरे तुरुंगवास भोगल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नमुद केले.
राजकारणाच्या सुरवातीच्या काळात सर्वसामान्य कुटुंबातील लोक माझ्या मागे उभे राहीले.पुर्ण शक्ती माझ्या मागे उभा केली.यात पणदरेचे धुळाबापू कोकरे,विठठलराव कोकरे यांच्यासह अनेकांची नावे घेता येतील.या लोकांमुळेच देश आणि राज्याच्या राजकारणात काम करण्याची संधी मिळाल्याचे पवार यांनी नमुद केले. बारामतीत अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक निर्मिती करण्याबाबत प्रमुख लोकांबरोबर चर्चा करणार असल्याचे देखील पवार म्हणाले.आजच्या कार्यक्रमानिमित्त अहिल्यादेवींचे स्मरण करताना नविन पिढी यशस्वी होइल,यासाठी प्रयत्नशील राहु,असे पवार म्हणाले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,धनगर आरक्षणाबाबत भाजप नेते राज्यात आणि दिल्लीत वेगवेगळी भुमिका घेतात.त्यांच्या मनात असणारी आरक्षणाबाबतची भुमिका त्यांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे.स्वत:च्या सोयीचे राजकारण भाजप नेत्यांनी करु नये,असा टोला सुळे यांनी लगावला.राज्यात आॅक्टोंबर मध्ये आघाडी सरकार आल्यानंतर अहिल्यादेवी,जिजाऊ,सावित्रीबाइ या तिन्ही मातांच्या कर्तृत्वाची भावी पिढीपर्यंत पोहचण्यासाठी शिक्षण धोरणात समावेश करणार.शिक्षणात मनुस्मृती येवु देणार नसल्याचा इशारा सुळे यांनी दिला.
यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भुषणराजे होळकर यांनी पुढील वर्षी अहिल्यादेवींची ३०० वी जयंती आहे.या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्यात अहिल्यादेवींच्या ३०० स्मारकांची निर्मिती करण्याची मागणी केली.त्या स्मारकातून युवा पिढीला प्रेरणा मिळेल,असे त्यांनी नमुद केले. यावेळी उत्तम जानकर,आमदार संजय जगताप,सक्षणा सलगर,युगेंद्र पवार यांची भाषणे झाली.यावेळी राष्ट्रवादी महिला काॅंग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे,आप्पासाहेब जगदाळे,अॅड संदीप गुजर,सत्यव्रत काळे,जगन्नाथ शेवाळे,शर्मिला पवार,सदाशिव सातव,अॅड.एस.एन जगताप,विठ्ठल देवकाते आदी उपस`थित होते.आभार सतीश खाेमणे यांनी मानले.
निवृत्त पोलीस अधिकारी मधोजी शिंदे यांनी धनगर आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे सांगितले.या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘शिंदेसाहेबां’नी आरक्षणा च्या प्रश्नात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांना पुर्ण ताकतीने मदत करणार असून लाेकांना न्याय देण्याची काळजी घेणार आहे,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिंदे यांच्या भूमिकेला पाठींबा व्यक्त केला.