पुरंदरचा सीताफळ पल्प परदेशात
By Admin | Published: October 17, 2015 01:04 AM2015-10-17T01:04:47+5:302015-10-17T01:04:47+5:30
सीताफळाचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुरंदर तालुक्यातील सीताफळाचा पल्प आता परदेशात निर्यात होऊ लागला आहे. खळद येथील पुरंदर मिल्क या तालुक्यातील साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या कंपनीच्या
सासवड : सीताफळाचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुरंदर तालुक्यातील सीताफळाचा पल्प आता परदेशात निर्यात होऊ लागला आहे. खळद येथील पुरंदर मिल्क या तालुक्यातील साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या कंपनीच्या माध्यमातून आज १० टन सीताफळ पल्पचा पहिला कंटेनर गुजरात येथील आनंद या ठिकाणी रवाना झाला असून, तेथील पिपाना बंदरातून या पल्पची बाहेरील देशात निर्यात होणार आहे.
खळद - गोटेमाळ (ता. पुरंदर) येथील पुरंदर मिल्कच्या इग्लू कोल्ड स्टोअरेजमधून हा कंटेनर रवाना झाला. येथील राजेंद्र एंटरप्रायजेस यांनी सासवड नगर परिषदेच्या फळबाजारातून सीताफळ घेऊन
पुरंदर मिल्कमध्ये महिलांना रोजगार देऊन हा पल्प काढला. प्रक्रिया
करून इग्लू कोल्ड स्टोअरेजमध्ये वजा १८ अंश सेल्सिअसला पल्पची काही दिवस साठवण
केली व आज त्याची निर्यात करण्यात आली. या वेळी पुरंदर मिल्कचे व्यवस्थापकीय संचालक संजय जगताप, संचालक प्रदीप पोमण, कंपनीचे सीईओ राजेंद्र मांढरे, शेतकरी बाळासाहेब काळाणे, सुदर्शन कुदळे, संदीप लिंभोरे,
मामा गरुड, सुधीर जाधव आदी याप्रसंगी उपस्थित होते. (वार्ताहर)