पुरंदर जलसिंचन योजनेची योजना अडकली लाल फितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:14 AM2021-09-10T04:14:19+5:302021-09-10T04:14:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खोर : गेल्या अनेक वर्षांपासून खोर (ता. दौंड) भागाचा पाणीप्रश्न काय सुटण्यास मार्ग निघत नसल्याचे प्राथमिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खोर : गेल्या अनेक वर्षांपासून खोर (ता. दौंड) भागाचा पाणीप्रश्न काय सुटण्यास मार्ग निघत नसल्याचे प्राथमिक चित्र पाहावयास मिळत आहे. शेतकरीवर्गाने १९ टक्के रक्कम भरली की जलसिंचन विभाग तेवढ्या पुरते आवर्तन सोडते. मात्र, ही रक्कम शेतकरी वर्ग असा किती दिवस भरत राहणार आहे. कायमस्वरूपीचा ह्या खोर भागाचा पाणीप्रश्न केव्हा मार्गी लागणार, असा सवाल खोरच्या ग्रामस्थांनी केला आहे.
खोर गावाच्या उशाशी दोन जलसिंचन पाणी योजना कार्यरत आहेत. बारामती तालुक्यातील जनाई-शिरसाई जलसिंजन योजना व पुरंदर तालुक्यातील पुरंदर जलसिंजन उपसा योजना. मात्र, या योजना केवळ मृगजळ बनल्या गेल्या आहेत. समोर पाणी दिसते, पण मिळत नाही अशीच अवस्था खोर कारांची झाली आहे. दरवर्षी पाणीटंचाई निर्माण झाली की, पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. सिंचन खात्याला पैसे भरावे लागतात आणि त्यानंतरच पाणी सुटले जाते. हे किती दिवस असे चालणार आहे. यावरती कायमस्वरूपी उपाय योजना का कोणी करीत नाही, असा सवाल या भागातील शेतकरी वर्गाला पडला गेला आहे. जनाई योजनेच्या अखत्यारीत फरतडेवस्ती व पद्मावती तलाव येत असून या योजनेतून सध्या खोर गावाला पाणी देण्यात आले आहे. तर दुसरीकडे पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून डोंबेवाडी पाझर तलावात पाणी हे सोडण्यात येत असते. या पुरंदर योजने पाणी खोरच्या डोंबेवाडी तलावात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. खोरचा डोंबेवाडी तलाव हा पुरंदर जलसिंचन योजनेच्या कार्यक्षेत्रात नसल्याने पाणी आणण्यास अडचणी येत आहेत. या योजनेचे बंदिस्त पाईपलाईन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, यावरती असून ही शिक्का मोहर्तब झाला नसून या पाणी योजनेचे घोडे कोठे अडकून पडले आहे हे कळण्यास मार्ग उरला नाही. आजही ऐन पावसाळ्याच्या कालावधीत डोंबेवाडी तलाव हा कोरडाठाक आहे. सर्वांत जास्त पाणी क्षमता असलेला हा तलाव असून या तलावाच्या बंदिस्त पाईपलाईन योजनेच्या बाबतीत लवकरात लवकर प्रयत्न करण्याच्या बाबतीत हालचाली सुरू करण्याची गरज आहे.
चौकट
उन्हाळ्याच्या कालावधीत फळबागा पाण्याअभावी निकामी होतात. अनेक भाग या वेळेत पाणी न मिळाल्यास टंचाईच्या काळात फोल ठरल्या जातात. मात्र, जर पुरंदर योजनेच्या पाण्याचा प्रश्न जर सुटला गेला, तर संपूर्ण खोर गावाचा कायमस्वरूपीचा पाणीप्रश्न मार्गी लागला जाणार आहे. या योजनेच्या बाबतीतील बंदिस्त पाईपलाईन योजनेचे सर्वेक्षण पूर्ण होऊन फाईल ही मंजुरीसाठी मंत्रालयात लालफितीत अडकली गेली आहे. आता यावरती शिक्का मोहर्तब कधी होईल आणि खोरच्या शिवारात या योजनेचे पाणी कधी सुटणार, हेच पाहणे महत्वपूर्ण असणार आहे.
फोटोओळ : खोर (ता. दौंड) येथील डोंबेवाडी पाझर तलाव अजून ऐन पावसाळ्यात कोरडाठाक पडला गेला आहे. आता प्रतीक्षा उरली ती पुरंदर उपास योजनेच्या पाण्याची.