पुरंदरमध्ये १९५ रुग्णांचे अहवाल कोरोनाबाधित.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:12 AM2021-04-28T04:12:46+5:302021-04-28T04:12:46+5:30

पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी, नीरा येथील शासकीय लॅबमध्ये ४७३ संशयित रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी १९५ रुग्णांचे कोरोना ...

In Purandar, reports of 195 patients were coronary. | पुरंदरमध्ये १९५ रुग्णांचे अहवाल कोरोनाबाधित.

पुरंदरमध्ये १९५ रुग्णांचे अहवाल कोरोनाबाधित.

Next

पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी, नीरा येथील शासकीय लॅबमध्ये ४७३ संशयित रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी १९५ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.

सासवड येथील शासकीय लॅबमध्ये २८२ संशयित रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी ९९ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. सासवड येथील ३८, भिवरी ८, सोनोरी ५, पवारवाडी ४, पिसर्वे, वाळुंज, पिंपळे, हिवरे, काळदरी, उदाचीवाडी, गुरूळी येथील प्रत्येकी ३, माळशिरस, एखतपूर, खळद, टेकवडी, बोपगाव, सुपा येथील प्रत्येकी २, माहूर, वाघापूर, शिवरी, दिवे, मावडी, भिवडी, चांबळी, गराडे, अंबोडी, वीर येथील प्रत्येकी १, तसेच तालुक्याबाहेरील १ असे एकूण ९९ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.

जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये १८४ संशयित रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी ९४ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले.

Web Title: In Purandar, reports of 195 patients were coronary.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.