पुरंदर तालुक्यात ५३ रुग्ण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:10 AM2021-05-29T04:10:22+5:302021-05-29T04:10:22+5:30
सासवड ग्रामीण रुग्णालयात ७५ संशयित रुग्णांची अँटीजन चाचणी तपासण्यात आली. यापैकी १५ रुग्णांचे अहवाल बाधित आले. सासवड शहरांमधील ११, ...
सासवड ग्रामीण रुग्णालयात ७५ संशयित रुग्णांची अँटीजन चाचणी तपासण्यात आली. यापैकी १५ रुग्णांचे अहवाल बाधित आले. सासवड शहरांमधील ११, ग्रामीण भागातील ४ रुग्ण कोथळे २, सिंगापूर वीर १.
जेजुरी ग्रामीण रुग्णालयात ५० संशयित रुग्णांची अँटीजन चाचणी तपासण्यात आली. यापैकी १३ रूग्णांचे अहवाल बाधित आले. जेजुरी २, ग्रामीण भागातील ११ रुग्ण कोथळे ३, कोळविहीरे, नाझरे क.प प्रत्येकी २, वाळुंज, धालेवाडी, पिंपरी, गुळूंचे प्रत्येकी १.
जेजुरी ग्रामीण रुग्णालयात ४६ संशयित रुग्णांची आरटी - पीसीआर चाचणी तपासण्यात आली. यापैकी २० रुग्णांचे अहवाल बधित आले. सासवड शहरांमधील ६, ग्रामीण भागातील १३, तर तालुक्या बाहेरचे १ रुग्ण, जेऊर ३, पांगारे , नावळी २, वीर, बेलसर, बोपगाव, कोडीत, नाझरे, सोनोरी प्रत्येकी १, तालुक्याबाहेरील मोराळवाडी १.
सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात २६ संशयीत रुग्णांची आरटी - पीसीआर रुग्णांचे अहवाल तपासण्यात आले. यामधील सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले. वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात २१ संशयीत रुग्णांची अँटीजन चाचणी तपासण्यात आली. यामधील सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले.
होम आयशोलेशन मध्ये १८४, विविध कोरोना सेंटर मध्ये ४७३ व जिल्हा ग्रामीण रुग्णालयात ३४४ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुक्यातील आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला जाधव यांनी दिली.