पुरंदर तालुका ऑक्सिजनसाठी स्वयंपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:52+5:302021-06-03T04:08:52+5:30

जेजुरी : कोरोना परिस्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता; मात्र आता पुरंदर तालुक्यात ऑक्सिजन प्लांट सुुरू झाल्याने तालुका स्वयंपूर्ण ...

Purandar taluka is self-sufficient in oxygen | पुरंदर तालुका ऑक्सिजनसाठी स्वयंपूर्ण

पुरंदर तालुका ऑक्सिजनसाठी स्वयंपूर्ण

Next

जेजुरी : कोरोना परिस्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता; मात्र आता पुरंदर तालुक्यात ऑक्सिजन प्लांट सुुरू झाल्याने तालुका स्वयंपूर्ण झाला आहे. यापुढील काळात ऑक्सिजनची टंचाई जाणवणार नाही, असे प्रतिपादन आमदार संजय जगताप यांनी केले.

जेजुरी औद्योगिक वसाहतीतील के. चंद्रा आयर्न इंजिनिअरिंग वर्क्स प्रा. लि. कंपनीने नवीन ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली आहे. या प्लांटचे उद्घाटन आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, कंपनीचे संचालक योगेंद्र चौधरी, व्यवस्थापक गणेश नायर, जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, औद्योगिक वसाहतीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, राज्यभरात ऑक्सिजन टंचाईमुळे रुग्णांच्या जीवन-मरणाचा गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. पुरंदर तालुक्यात मात्र जेजुरी औद्योगिक वसाहतीतील या कंपनीकडून ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. मात्र, कंपनीची उत्पादन क्षमता कमी असल्याने मोठ्या टंचाईचा सामना करावा लागला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्याने या कंपनीला नवीन प्लांटच्या उभारणीची परवानगी मिळवून देण्यात आली. कंपनीनेही महिनाभरात नवीन प्लांटची उभारणी केली आहे. पुरंदर तालुक्यात ऑक्सिजनची टंचाई आता जाणवणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नीरज चंद्रा म्हणाले, जेजुरी औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या लिक्विड ऑक्सिजन प्लांटमधून दररोज ८०० सिलिंडरचे उत्पादन होत होते. हे उत्पादन अपुरे ठरत होते. कोविडमुळे ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर होती. उत्पादन क्षमता कमी असल्याने कंपनी व्यवस्थपनावर प्रचंड तणाव येत होता. कंपनीने थोड्या कालावधीत एएसयू (एअर सप्रेशन युनिट) हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभा केला आहे. या नवीन प्लांटची उत्पादन क्षमता ८०० सिलिंडरचीच असून, कंपनी आता दररोज एक हजार १६०० सिलिंडरचे उत्पादन घेऊ शकते. ऑक्सिजनची आता टंचाई जाणवणार नाही, अशी माहिती कंपनीचे मालक नीरज चंद्रा यांनी दिली.

०२ जेजुरी

ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करताना मान्यवर.

===Photopath===

020621\02pun_2_02062021_6.jpg

===Caption===

०२ जेजुरीऑक्सिजन प्लान्टचे उदघाटन करताना मान्यवर

Web Title: Purandar taluka is self-sufficient in oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.