महापौर निधीतून २० व्हेंटिलेटर खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:20 AM2021-05-05T04:20:12+5:302021-05-05T04:20:12+5:30
पुणे : महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची कमतरता लक्षात घेऊन, आज महापालिकेने ३ लाख २५ हजार रूपये किंमतीचा एक असे २० ...
पुणे : महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची कमतरता लक्षात घेऊन, आज महापालिकेने ३ लाख २५ हजार रूपये किंमतीचा एक असे २० व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ महापौर निधीतून हे व्हेंटिलेटर खरेदी करण्यात येणार असून, स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत मान्यता देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली़
महापालिकेच्या नायडू रूग्णालयांसह इतर रूग्णालयांमध्ये हे व्हेंटिलेटर पुरविण्यात येणार आहे़ दरम्यान महापालिकेने आज आणखी ६०० रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी केले असून, ही इंजेक्शन खरेदी सीएसआर फंडातून झाली आहे़ महापालिकेने २५ हजार रेडडेसिविर इंजेक्शन खरेदीची तयारी ठेवली असून, या खरेदीसाठी विविध कंपन्यांशी सातत्याने महापालिका संपर्कात असल्याचेही रासने यांनी सांगितले़
----------------------
एस़एऩडी़टी़ कॉलेजसमोरील पादचारी पूल हटविणार
कर्वे रस्त्यावरील मेट्रो मार्गाला अडसर ठरणारा एस़एऩडी़टी़ कॉलेजसमोरील पादचारी हटविण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे़ हा पूल आता अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहासमोर हलविण्यात येणार आहे़ तत्पूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येणार असून, जर तो वापरण्या योग्य राहत नसेल तर तो पूल तोडण्यात येणार आहे़
------------------
कात्रज डेअरीला मोबदला म्हणून १ कोटी देण्यास मान्यता
कात्रज डेअरी येथून आंबेगाव पठार कडे जाणाºया रस्त्याच्या रुंदीकरणासाठी कात्रज डेअरीने जागा देण्याची तयारी दर्शविल्याने, महापालिकेने त्यांना बाधित होणाºया बांधकामाच्या बदल्यात १ कोटी ६ लाख रुपये खर्च देण्यास मान्यता दिली असल्याचेही रासने यांनी यावेळी सांगितले़
------------------------