पदाधिका-यांसाठी महागड्या गाड्यांची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 08:17 AM2017-11-08T08:17:32+5:302017-11-08T08:17:35+5:30
सरकारी कामासाठी अशा नावाने महापालिकेकडून पदाधिकाºयांसाठी १ कोटी रुपयांची १५ वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. स्थायी समितीने या खर्चास मंगळवारी झालेल्या सभेत मान्यता दिली.
पुणे : सरकारी कामासाठी अशा नावाने महापालिकेकडून पदाधिकाºयांसाठी १ कोटी रुपयांची १५ वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. स्थायी समितीने या खर्चास मंगळवारी झालेल्या सभेत मान्यता दिली. या सर्व कार असून, त्यातील ९ लहान, तर ७ मोठ्या आहेत. वाहन खरेदीसंबंधीचे सर्व निर्बंध पाळून ही खरेदी होत असल्याचे सांगण्यात आले.
महापालिकेत महापौर व आयुक्त वगळता अन्य सर्व पदाधिकाºयांना जुन्या अॅम्बसिडर गाड्या आहेत. प्रभाग समिती अध्यक्षही अशीच गाडी वापरतात. स्वमालकीच्या अत्याधुनिक गाड्या असूनही पदाधिकारी त्या वापरत नाहीत. महापालिकेच्या मालकीचे वाहन वापरण्यात वेगळा रूबाब असतो, त्यामुळे खराब असल्या तरीही बहुसंख्य पदाधिकारी महापालिकेच्या मालकीचेच वाहन वापरतात.
या सर्व गाड्या जुन्या झाल्या आहेत. सतत कामे काढतात, त्यासाठी बराच खर्च करावा लागतो. तो गेले काही वर्षे वाढतच चालला आहे.
पदाधिकारी गेले काही महिने नव्या वाहनांच्या खरेदीचा आग्रह धरत होते. त्यामुळे प्रशासनाने ही १ कोटी रुपयांची वाहन खरेदी काढली आहे. सरकारी कामांसाठी म्हणून वाहनांची आवश्यकता असल्याने खरेदी करण्यात येत आहे, असे यासंबंधीच्या प्रस्तावात म्हटले आहे. एकूण १५ वाहनांसाठी १ कोटी रुपयांचा खर्च करण्यास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली.