पीएमपीतर्फे बसखरेदीची पुनर्निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 04:01 AM2018-04-30T04:01:40+5:302018-04-30T04:01:40+5:30
पुणे परिवहन महानगरच्या (पीएमपी) वतीने ८०० नवीन बसची खरेदी केली जाणार असून, पहिल्या निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने पुनर्निविदा काढण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन गाड्यांची खरेदी केली जाणार आहे.
पिंपरी : पुणे परिवहन महानगरच्या (पीएमपी) वतीने ८०० नवीन बसची खरेदी केली जाणार असून, पहिल्या निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने पुनर्निविदा काढण्यात येणार आहे. प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन गाड्यांची खरेदी केली जाणार आहे.
पीएमपीच्या प्रमुख नयना गुंडे या प्रशिक्षणासाठी गेल्याने पीएमपीचा पदभार आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे देण्यात आला आहे. हर्डीकर यांनी लक्ष घातल्यानंतर शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. पीएमपी मार्गावर बस न धावण्यास कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
रस्त्यावर दररोज १४१५ गाड्या सुरू राहणे आवश्यक असताना प्रत्यक्षात १३८० गाड्या सुरू होत्या. त्यामुळे संबंधितांना नोटीस दिली आहे. मार्गाची पाहणी आयुक्तांनी केली. सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्यासाठी ८०० बसगाड्या घेण्याचा विषय दोन्ही महापालिकांनी मंजूर केला. त्यात ४०० सीएनजी आणि ४०० साध्या अशा ८०० बसगाड्यांचा समावेश होता. या विषयी विचारले असता हर्डीकर म्हणाले, ‘‘पीएमपीसाठी नव्याने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठीच्या निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने ८०० गाड्यांसाठी पुनर्निविदा मागविण्यात येणार आहे.’’