माळेगांवमध्ये भाजी खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:10 AM2021-04-27T04:10:25+5:302021-04-27T04:10:25+5:30
माळेगांवमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड कोरोना नियमावलीला डावलले माळेगाव : नुकताच नगरपंचायतीचा दर्जा मिळालेल्या माळेगाव (ता. ...
माळेगांवमध्ये भाजी खरेदी
करण्यासाठी ग्राहकांची झुंबड
कोरोना नियमावलीला डावलले
माळेगाव : नुकताच नगरपंचायतीचा दर्जा मिळालेल्या माळेगाव (ता. बारामती) येथे नागरिकांनी कोरोना नियमावलीला डावलल्याचे चित्र दिसून आले. वीकेंड लॉकडाऊननंतर भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची प्रचंड झुंबड उडाली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला आहे.
त्यामुळे कडक निर्बंध सुरू असूनदेखील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना नियमावलीचे पालन होत नसल्याने ही वेळ आल्याचे वास्तव आहे. राज्य शासनाकडून दर आठवड्याच्या शुक्रवारी संध्याकाळी सहा ते सोमवार सकाळी सहापर्यंत वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येतात. हा वीकेंड लॉकडाऊन संपल्यानंतर माळेगाव येथील भाजी मंडईत भाजी खरेदीसाठी झुंबड उडाली होती. ग्राहकांनी तोबा गर्दी केली होती. काही विक्रेते व ग्राहकांना मास्कदेखील नव्हता. अनेक भाजी दुकानात पाचपेक्षा जादा ग्राहक एकाचवेळी होते. सोशल डिस्टन्सिंग नियम पायदळी तुडवले जात होते. कोरोनाबाधित रुग्णवाढीचे कारण जणू याचवेळी अधोरेखित झाले.
माळेगाव कोरोना हॉटस्पॉट असताना अशी गर्दी पाहता कोरोनाचा संसर्ग अधिक होण्याची शक्यता आहे. या वेळी नियमांचे पालन न करणाऱ्या भाजीविक्रेते व ग्राहकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे यांनी सांगितले.
माळेगाव येथे वीकेंड लॉकडाऊननंतर भाजी मंडईत झालेली गर्दी.
२६०४२०२१-बारामती-१२