आरोग्यासाठी शुद्ध पाणी महत्वाचे - गावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:13 AM2021-08-20T04:13:46+5:302021-08-20T04:13:46+5:30
टाकळी हाजी : आरोग्य, शिक्षण याचबरोबर शुद्ध पाण्याची उत्तम आरोग्यासाठी गरज असून, त्यांची गरज ओळखून झायलम वॉटर फाऊंडेशनच्या ...
टाकळी हाजी : आरोग्य, शिक्षण याचबरोबर शुद्ध पाण्याची उत्तम आरोग्यासाठी गरज असून, त्यांची गरज ओळखून झायलम वॉटर फाऊंडेशनच्या वतीने हे काम करण्यात आले असल्याचे प्रतिपादन घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे यांनी केले.
शिंदेवाडी (मलठण) येथे झायलम प्लेनेट वॉटर फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद शाळेत वॉटर फिल्टरचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी घोडगंगाचे संचालक राजेंद्रदादा गावडे, पंचायत समितीच्या माजी सदस्या डॉ. कल्पनाताई पोकळे, सरपंच शशिकला फुलसुंदर, माजी सरपंच सुहास थोरात, सदस्य किरण शिंदे, योगेश कदम, सीमाताई कोळपे, दादासाहेब गावडे, सविता चोरमले, गंगाराम शिंदे, रखमा शिंदे, हर्षद शिदे, उद्योजक मुकुंद नरवडे, उत्तम लकडे, कानिफनाथ हिलाल, युवानेते संदीपभाऊ गायकवाड, सुखदेव कोळपे, सतीश शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजय शिंदे, मुख्याध्यापक गंगाधर जगताप,अशोक गाडेकर, झायलमचे शीतल हेले, सुधीर पांडे, शिखा गिल्डा, प्रशांत देशपांडे, चैतन्य कुसलकर, संतोष भिसे, भुवन पराशर उपस्थित होते .
घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे म्हणाले की, राज्यांचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात रस्ते, सभामंडप यासाठी निधी उपलब्ध होत आहे. शिंदेवाडीमधील प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहे. सूत्रसंचालन हर्षद शिंदे यांनी केले.