लाल महालातील 'त्या' जागेचं गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण, 'लावणी रील्स'वरुन संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 04:25 PM2022-05-21T16:25:27+5:302022-05-21T16:30:32+5:30

१६ एप्रिल रोजी लाल महालात आरोपी वैष्णवी पाटील व तीच्या सोबत असलेली एक स्त्री व दोन पुरुष असे लाल महाल येथे येऊन लाल महालाच्या आतील मोकळ्या जागेत वैष्णवी पाटील हिने लावणी नृत्य केले

Purification of that place in Lal Mahal by sprinkling cow urine, anger from planting dance | लाल महालातील 'त्या' जागेचं गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण, 'लावणी रील्स'वरुन संताप

लाल महालातील 'त्या' जागेचं गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण, 'लावणी रील्स'वरुन संताप

googlenewsNext

पुणे - राज्यात आणि सोशल मीडियात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असेलल्या लाल महालातील लावणीचे रील्स केल्या प्रकरणावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी राकेश विनोद सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठी कलाकार वैष्णवी पाटीलसोबत इतर तीन जणांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. मात्र, अद्यापही अनेक संघटनांकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आता, गोमुत्र शिंपडून त्या जागेचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे.  

१६ एप्रिल रोजी लाल महालात आरोपी वैष्णवी पाटील व तीच्या सोबत असलेली एक स्त्री व दोन पुरुष असे लाल महाल येथे येऊन लाल महालाच्या आतील मोकळ्या जागेत वैष्णवी पाटील हिने लावणी नृत्य केले. तिच्यासोबत असलेल्या पुरुषांपैकी दोन पुरुषांनी त्याचे मोबाईलमध्ये शुटींग करून त्याचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केला. यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी यावर आक्षेप घेतला होता. या प्रकरणात लाल महालाचे रखवालदार सोनवणे यांनी फिर्याद दिली. त्यावर बोलताना सोनवणे म्हणाले, मी त्यांना लावणी नृत्य व त्याचे शुटींग करण्यापासून रोखले होते. पण त्यांनी ते ऐकले नाही.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडकडून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर, अखिल भारतीय मराठा महासंघाने ज्या ठिकाणी हे चित्रीकरण झालं, त्या भागात गोमूत्र शिंपडून त्याचं शुद्धीकरण केलं आहे. तत्पूर्वी, जिजाऊंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करुन पुष्पहार अर्पण केला. तसेच, लाल महालातील या लावणी प्रकरणावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटत असून सोशल मीडियावरुन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. 

वैष्णवी पाटीलविरुद्ध गुन्हा, माफीही मागितली

या सगळ्या प्रकरणावर वैष्णवीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. या व्हिडिओमध्ये माफी मागत वैष्णवीने म्हणाली, 'पुण्याच्या लाल महालात व्हिडीओ शूट करताना माझ्या मनात कोणतेही वाईट विचार नव्हते. गाणं सुंदर असल्याने त्यावर व्हिडीओ करावा असे माझ्या मनात आले. त्यामुळे मी त्यावर मी व्हिडीओ शूट केला. लाल महालात मी व्हिडीओ शूट केला ही माझ्याकडून चूक झाली आणि ती चूक मी मान्य करते. जितकेही शिवप्रेमी आहेत, जी जनता माझ्यावर प्रेम करते, माझ्या नृत्यावर प्रेम करते त्या सर्वांची मी माफी मागतें.' असा व्हिडीओ वैष्णवीने पोस्ट करत माफी मागितली आहे.
 

Web Title: Purification of that place in Lal Mahal by sprinkling cow urine, anger from planting dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.