Pune Crime | महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग; तरुणावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 11:20 IST2023-01-30T11:18:29+5:302023-01-30T11:20:01+5:30
पिंपरी परिसरात नोव्हेंबर २०२२ ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला...

Pune Crime | महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग; तरुणावर गुन्हा दाखल
पिंपरी : महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग केला तसेच तरुणाने तरुणीकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर तिला आणि तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. पिंपरी परिसरात नोव्हेंबर २०२२ ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.
आकर्ष अजितकुमार मदनवार (वय २०, रा. मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने शनिवारी (दि. २८) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या फोनवर संपर्क करून तिचा पाठलाग केला. फिर्यादी महाविद्यालयात जात असताना तिचा पाठलाग करून तिला लग्नाची तसेच प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली.
हा प्रकार फिर्यादीच्या वडिलांना समजला. त्यानंतर फिर्यादीच्या वडिलांनी आरोपीला समजावून सांगितले. त्यानंतरही आरोपीने फिर्यादीचा पाठलाग केला. आरोपीचा मोबाइल क्रमांक ब्लॅकलिस्टला टाकल्यावरून फिर्यादीस मारहाण करून, माझे ऐकले नाही तर तुला व तुझ्या कुटुंबीयांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादीचा विनयभंग केला.