पुरुषोत्तम करंडक प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर; अंतिम स्पर्धेसाठी नऊ संघांची घोषणा

By श्रीकिशन काळे | Published: August 30, 2023 09:42 PM2023-08-30T21:42:30+5:302023-08-30T21:43:04+5:30

अंतिम फेरीसाठी 9 संघांची निवड...

Purushottam Karandak preliminary round results announced; Nine teams announced for the final tournament | पुरुषोत्तम करंडक प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर; अंतिम स्पर्धेसाठी नऊ संघांची घोषणा

पुरुषोत्तम करंडक प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर; अंतिम स्पर्धेसाठी नऊ संघांची घोषणा

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 58व्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या निकालाची आज घोषणा करण्यात आली असून अंतिम फेरीसाठी 9 संघांची निवड करण्यात आली आहे. अंतिम स्पर्धेत पोहोचलेले संघ : महाविद्यालयाचे नाव आणि कंसात एकांकिकेचे नाव या क्रमाने :

अप्पासाहेब जेधे महाविद्यालय (पाईक), झील अभियांत्रिकी महाविद्यालय (परत फिरारे), आयएमसीसी महाविद्यायल, (मायबाब..!?), मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय (रवायत ए विरासत), मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड (फेल सेफ), स. प. महाविद्यालय (कृष्णपक्ष), विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, बारामती (पाऊस पाड्या), राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे (पंक्चर पोहे), टिळक आयुर्वेद महाविद्यालय (पिक्सल्स).

अभिनय उत्तेजनार्थ दहा : (कलाकाराचे नाव, कंसात भूमिका, एकांकिकांचे नाव आणि महाविद्यालय) सानिका आपटे (रमा, त्रिजा, फर्ग्युसन महाविद्यालय, स्वायत्त), पूर्वा हारुगडे (संगिता, आरं संसार संसार, आयएलएस विधी महाविद्यालय), शंतनू गायकवाड (दश्श्यू, राखणदार, मॉडर्न कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर), गार्गी माईणकर (साथीदार/आजी, स्त्रीसुक्त - अर्थात काळ्या बाळीची कथा, म. ए. सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍), तृप्ती जाधव (लक्ष्मी, पिंपळपान, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती), मैत्रेयी वडगे (राधा, मांदिआळी, श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय), अंतरा वाडेकर (प्रिया, तोरण, पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर), समृद्धी शेट्टी (ती, फोबिया, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी), विवेक पगारे (मधुकर देशपांडे, अमृतफळे, पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), स्वरा कळस (मिनी, एजंट वन, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे).

उत्तेजनार्थ विद्यार्थी दिग्दर्शक : श्रेयस जोशी (सिनेमा, मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय).

उत्तेजनार्थ विद्यार्थिनी दिग्दर्शक : आर्या देवरे (पूर्णविराम, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय).

दर्जा खालावलेले संघ : सेकंडह्यांड (डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ताथवडे), अवचित (जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ नऱ्हे, टेक्निकल कॅम्पस), रहस्यचक्र (इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड मॅनेजमेंट, परंदवाडी), इ.एल.आय.एस.एच.ए.आर. (सिंहगड ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, कोंढवा), अंक पहिला (एआयएसएसएमएसआयओआयटी), 3 टक्के (पीडीईए अभियांत्रिकी महाविद्यालय, मांजरी), बाय हुक ऑर बाय क्रुक (श्रीमती काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय), तेरे मेरे सपने (ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय), या सुखांनो या (भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय, नऱ्हे), ईटाळ (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे).

स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 16 ते 30 ऑगस्ट या कालावधीत झाली. एकूण 51 संघांनी सादरीकरण केले. अंतिम फेरी दि. 9 व 10 सप्टेंबर रोजी भरत नाट्य मंदिरात होणार आहे. प्राथमिक फेरीच्या स्पर्धेचे परिक्षण प्राथमिक फेरीचे परिक्षक गिरीश केमकर, मिलिंद कुलकर्णी, शेखर नाईक यांनी केले.

Web Title: Purushottam Karandak preliminary round results announced; Nine teams announced for the final tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.