Purushottam Karandak: ‘पुरूषोत्तम’ची तिकिट विक्री यंदापासून ऑनलाइन; या तारखेपासून तिकीट विक्री सुरू

By श्रीकिशन काळे | Published: July 11, 2023 03:05 PM2023-07-11T15:05:29+5:302023-07-11T15:06:14+5:30

अभिवादन सोहळा रविवारी होणार...

Purushottam Karandak: 'Purushottam' ticket sales online from this year; Ticket sales start from this date | Purushottam Karandak: ‘पुरूषोत्तम’ची तिकिट विक्री यंदापासून ऑनलाइन; या तारखेपासून तिकीट विक्री सुरू

Purushottam Karandak: ‘पुरूषोत्तम’ची तिकिट विक्री यंदापासून ऑनलाइन; या तारखेपासून तिकीट विक्री सुरू

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठीचे अर्ज वाटप दि. १४ व १५ जुलै रोजी करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे अर्ज वाटप सायंकाळी ६ ते ८ या वेळात संस्थेच्या कार्यालयात, १२०५, विवेक अपार्टमेंट, शुक्रवार पेठ, सुभाष नगर, पुणे येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी निवेदनाद्वारे दिली.

स्पर्धा पाहू इच्छिणाऱ्या ज्येष्ठांना तसेच पुणेकरांना स्पर्धेची तिकिटे मिळण्यात अडणची येतात. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना स्पर्धेचा आनंद घेता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन संस्थेने यंदाच्या वर्षीपासून स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सिझन तिकिटे ऑनलाईनही विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन तिकिट विकत घेणाऱ्यांसाठी नाट्यगृहातील काही आसने आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. ऑनलाईन तिकिट विक्रीला दि. १४ जुलैपासून सुरुवात होणार आहे.  

‌‘उच्छाद' दीर्घांक रविवारी
महाराष्ट्रीय कलोपासकचे माजी चिटणीस कै. राजाभाऊ नातू यांच्या २९व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रविवार, दि. १६ जुलै रोजी सायंकाळी ६.३०वाजता भरत नाट्य मंदिरात ‌‘उच्छाद' या दीर्घांकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. सायली फाटक, तन्वी कुलकर्णी, सिद्धेश धुरी, निरंजन पेडणेकर यांच्या यात भूमिका असून दिग्दर्शन अनुपम बर्वे यांचे आहे. अमेय गोसावी यांनी निर्मितीची बाजू सांभाळली आहे.  प्रयोग सर्वांसाठी खुला आहे.

Web Title: Purushottam Karandak: 'Purushottam' ticket sales online from this year; Ticket sales start from this date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.