कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्याला धक्का

By admin | Published: February 24, 2017 03:46 AM2017-02-24T03:46:50+5:302017-02-24T03:46:50+5:30

प्रभाग क्रमांक २८ महर्षीनगर- सॅलसबरी पार्कमध्ये भाजपाचे उमेदवार प्रवीण चोरबेले, श्रीनाथ भिमाले, कविता वैरागे

Pushing the Congress to the Chess | कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्याला धक्का

कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्याला धक्का

Next

बिबवेवाडी : प्रभाग क्रमांक २८ महर्षीनगर- सॅलसबरी पार्कमध्ये भाजपाचे उमेदवार प्रवीण चोरबेले, श्रीनाथ भिमाले, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर यांनी प्रचंड बहुमत घेत विजयश्री खेचून आणली. या प्रभागात भाजपाच्या उमेदवारांनी कॉँग्रेसच्या बालेकिल्ल्यात जोरदार मुसंडी मारली आहे.
अ गटामधून कविता भारत वैरागे यांनी कॉँग्रेसच्या शर्वरी अविनाश गोतारणे यांचा पराभव केला. ब गटात भाजपाच्या श्रीनाथ भिमाले यांनी कॉँग्रेसचे सादिक गफुर लुकडे यांचा पराभव केले. शिवसेना तिसऱ्या स्थानावर राहिली. क गटात भाजपाच्या राजश्री शिळीमकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या श्वेता होनराव यांचा पराभव केला.
येथेही शिवसेनेच्या अश्विनी राऊत तिसऱ्या स्थानावर गेल्या. ड गटात भाजपाचे प्रवीण चोरबेले यांनी कॉँग्रेसचे युवराज शहा यांचा पराभव केला. अपक्ष बाळासाहेब अटल तिसऱ्या स्थानावर होते.


प्रतिष्ठा  पणाला तरीही...
काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचे प्रवीण चोरबेले व कॉँग्रेसचे युवराज शहा यांच्या लढतीकडे पुणेकरांचे विशेष लक्ष होते. या लढतीमध्ये छाजेड यांनी युवराज शहा यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. तरी चोरबेले यांनी ९,१९५ मतांनी शहा यांचा दणदणीत पराभव करीत विजयश्री खेचून आणली.


कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता
बिबवेवाडी : बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक २७, ३७ व ४१ या तीन प्रभागांची मतमोजणी करण्यात आली. मुख्य निवडणूक अधिकारी राणी ताठे व सहायक अधिकारी म्हणून अविनाश सपकाळ यांनी काम पाहिले. सणस मैदानात झालेल्या या निवडणूक निकाल प्रक्रियेला सकाळी १०.१५ वाजता सुरुवात झाली. सायंकाळी ५.४५ ला सर्व निकाल लागले.
प्रभाग २७ कोंढवा खुर्द-मिठानगरमधील अ गटात राष्ट्रवादीचे अब्दुल गफुर पठाण विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे अमर पवळे यांचा पराभव केला. ब गटात राष्ट्रवादीच्या परवीन शेख यांनी शिवसेनेच्या स्मिता बाबर यांचा पराभव केला. क गटात राष्ट्रवादीला यश मिळाले असून त्यांनी शिवसेनेच्या सीमा चौधरी यांचा पराभव केला. ड गटात मनसेला विजय मिळाला असून साईनाथ बाबर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे रईस सुंडके यांचा पराभव केला.


कोरेगाव पार्क-घोरपडीत अटीतटीची लढत
हड़पसर : प्रभाग क्र. २१ मध्ये कोरेगाव पार्क-घोरपडीमध्ये भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले. उमेश गायकवाड, लता धायरकर, नवनाथ कांबळे, मंगला मंत्री निवडून आले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाबू वागस्कर, वनिता वागस्कर यांनी काट्याची टक्कर दिली. भाजपाचे नवनाथ कांबळे हे ५,६७५ मतांनी विजयी झाले. त्यांना १३ हजार २६८ मते मिळाली. विद्यमान नगरसेवक प्रशांत म्हस्के व नगरसेविका सुरेखा कावडे यांना पराभव पत्करावा लागला.
राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत म्हस्के यांना ७५३९ मते मिळाली. लता धायकर ४४६८ मतांनी विजयी झाल्या. त्यांना ११ हजार ८३० मते मिळाली. तर काँग्रेसच्या उमेदवार पूनम बोरते यांना ७३६२ मते मिळाली. सुरेखा कावडेंना ९४१७ मते मिळाली. त्यांचा २४० मतांनी पराभव करून मंगला मंत्री निवडून आल्या. त्यांना ९६५७ मते मिळाली. तर वनिता वागस्कर यांना ८७९७ मते मिळाली. उमेश गायकवाड हे ४४२ मतांनी निवडून आले. त्यांना १० हजार १३६ मते मिळाली तर बाबू वागस्कर यांना ९६९४ मते मिळाली.
साधना विद्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीला प्रभाग क्र. २१ मधील टपाल मतमोजणी सुरू झाली. शेवटच्या टप्प्यात चित्र पालटले.

राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार विजयी
प्रभाग क्र. २२ मधून चारही राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे उमेदवार निवडून आले. चेतन तुपे, बंडू गायकवाड, हेमलता मगर, चंचला कोद्रे हे चारही उमेदवार विजयी झाले, भाजपाबरोबर राष्ट्रवादीशी लढत झाली. मतमोजणी दुपारी ४ वाजता सुरू झाली, निकाल ७ वाजता जाहीर झाला. पहिल्या फेरीत भाजपा पुढे होते, त्यानंतर राष्ट्रवादी व भाजपामध्ये लढत झाली, चेतन तुपे हे ३८२८ मतांनी निवडून आले. त्यांना १५११५ एवढी मते मिळाली. बंडू गायकवाड हे १५५९ मतांनी निवडून आले. त्यांना १३७६५ एवढी मते घेतली. चंचला कोद्रे या ३०९९ मतांनी निवडून आल्या, त्यांना १४५७६ एवढी मते मिळाली तर हेमलता मगर या २७८२ एवढ्या मतांनी विजयी झाल्या, त्यांना १४६७३ एवढी मते मिळाली. भाजपाचे उमेदवार दिलीप तुपे यांना १२२०६ मते मिळाली, तर सुकन्या गायकवाड यांना ११४७७ मते मिळाली. सुवर्णा जगताप यांना ५२०६ मते मिळाली. या प्रभागात
भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये चांगली लढाई झाली. पॅनेल टू पॅनेल मतदान झाल्याने राष्ट्रवादीला यश मिळाले.

Web Title: Pushing the Congress to the Chess

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.