शिरूर तालुक्यात आमदार अशोक पवार, मंगलदार बांदल यांच्या पॅनलला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:14 AM2021-01-19T04:14:12+5:302021-01-19T04:14:12+5:30
शिरुर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तालुक्यातील उर्वरित ६२ ग्रामपंचायत निवडणुकीत ...
शिरुर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तालुक्यातील उर्वरित ६२ ग्रामपंचायत निवडणुकीत ५१६ जागांसाठी एकुण १ हजार १६२ उमेदवार रिंगणारत होते. सोमवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यात अनेक धक्कादायक निकाल लागले. मतमोजणी शिरुर येथील कुकडी हॉल येथे प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख, तहसिलदार लैला शेख यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
सकाळी दहा वाजता सुरु केलेल्या या ६२
ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी १४ फेऱ्या घेण्यात आल्या. दुपारी ४ वाजेपर्यंत आलेल्या निकालानुसार तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिक्रापुर, तळेगाव ढमढेरे, कारेगाव, वडगाव रासाई, या सह गावातील अनेक गावातील नागरीकांनी प्रस्तापितांविरोधात निकाल दिला आहे. या मध्ये वडगाव रासाई या आमदार अशोक पवार यांच्या गावात त्यांच्या समर्थक पॅनेलला अवघ्या ३ जागावर विजय मिळाला. तर विरोधी पॅनेलमे १२ जागावर विजय मिळवला. या निवडणूकीत अनेक मात्तबरांना पराभवाचे धक्के बसले. आमदार ॲड. अशोक पवार यांच्या वडगाव रासाई गावात त्याच्या पॅनेलचा पराभव झाला. कारेगावमध्ये भाजपाचे नेते विद्यमान सरपंच अनिल नवले यांचा तर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख पोपटराव शेलार यांच्या पत्नी उषा शेलार यांचा नांगरगाव ग्रामपंचायतीत पराभव झाला. चिंचणी ग्रामपंचायत निवड्णूकीत शिवसेनेचे ग्राहक सरंक्षण कक्षाचे तालुकाध्यक्ष अनिल पवार पराभूत झाले. त्याच बरोबर शिरुर आंबेगाव शिवसेनेचे तालुका प्रमुख गणेश जामदार यांच्या पत्नी मलठण मधून पराभूत झाल्या. जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या पुतण्या निखील बांदल शिक्रापूर ग्रामपंचायतीत पराभव झाला. शिक्रापूरमध्ये माजी उपसरपंच रामभाउ सासवडे, भाजपाचे नेते राजाभाऊ मांढरे यांच्या पत्नी भारती मांढरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. उरळगाव ग्रामपंचायतीत विद्यमान आमदारांचे स्वीय सहाय्य्क राजेंद्र गिरमकर यांचा पराभव झाला. तर जय मल्हार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष दौलत शितोळे यांचे पॅनेल शिंदोडी गावात निवडून आले. पण त्यांच्या पत्नी पूजा शितोळे या पराभूत झाल्या.
प्रमुख विजयी उमेदवारामध्ये तळेगाव मधून पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, राष्ट्रवादी कॉग्रेस युवकचे अध्यक्ष सागर निंबाळकर हे न्हावरा मधून विजयी झाले. इनामगावमध्ये ॲड सिध्देश्वर नांद्रे निवडून आले. शिक्रापूरमधून मयूर करंजे प्रमुख विजयी उमेदवारा मध्ये आहेत. कारेगाव मधील प्रमुख विजयी उमेदवारात अजित कोहोकडे आहेत.वढू येथे प्रफुल्ल शिवले यांच्या पॅनेल चा विजयी झाला.
फोटो ओळी : शिरूर येथे निकाल ऐकण्यासाठी
मतमोजणी केंद्रा बाहेर जमलेले नागरीक