Video: चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांवर फुलांची उधळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 14:01 IST2022-02-14T13:59:58+5:302022-02-14T14:01:15+5:30
विश्वकर्मा जयंतीच्या पूर्वसंध्येला पुण्यातील ज्या श्रमसाधकांनी मेट्रो उभी केली त्यांचे आभार व्यक्त करून सन्मान करण्यात आला.

Video: चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांवर फुलांची उधळण
पुणे : विश्वकर्मा जयंतीच्या पूर्वसंध्येला पुण्यातील ज्या श्रमसाधकांनी मेट्रो उभी केली त्यांचे आभार व्यक्त करून सन्मान करण्यात आला. मेट्रो चे काम करणाऱ्या श्रम सेवकांचा पुण्यातील गरवारे कॉलेज येथील मेट्रो स्टेशन वर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुष्पाभिषेक करण्यात आला .
पुण्यातील मेट्रो चे मूर्त स्वरूप उभे करताना कोरोना संकटात हि रात्रं दिवस काम करणाऱ्या श्रम साधकांवर चंद्रकांत पाटील यांनी पुष्प अभिषेक करून सन्मान केला. यानिमित्ताने त्यांच्या वर फुले उधळून, त्यांच्या प्रति श्रद्धा व्यक्त केली आणि अभिनंदनही केले. यावेळी मेट्रो मधील अभियंत्यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील बांधकाम कौशल्य असणारे हिरोजी इंदलकर यांच्या नावाची वीट देऊन सन्मान करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या कर्मचाऱ्यांवर फुलांची उधळण #Pune@ChDadaPatilpic.twitter.com/EtWUJiWkgr
— Lokmat (@lokmat) February 14, 2022
मेट्रोचे अतुल गाडगीळ आणि इतर अभियंते, भाजपचे नगरसेवक दीपक पोटे, माधुरीताई सहस्त्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, मिताली सावळेकर आदी यावेळी उपथित होते. गिरीश खत्री मित्र परिवाराच्या वतीने पुणे मेट्रो च्या श्रम साधकांचा हा पुष्प अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता.