नारायणगावच्या उपसरपंचपदी पुष्पाताई आहेर बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:10 AM2021-03-31T04:10:42+5:302021-03-31T04:10:42+5:30
उपसरपंच सारिका डेरे यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त होते. ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे यांनी आज (दि. ३०) उपसरपंच ...
उपसरपंच सारिका डेरे यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त होते. ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे यांनी आज (दि. ३०) उपसरपंच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. ग्रामपंचायतीच्या सभागृहात उपसरपंचपदाची निवडणूक लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे याच्या अध्यक्षते खाली झाली . उपसरपंच पदासाठी वार्ड क्र.५ च्या सदस्या पुष्पाताई आहेर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे व लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी दिली. निवड सहा महिने कालावधीसाठी असल्याची माहिती सरपंच पाटे यांनी दिली .
उपसरपंच म्हणून पुष्पाताई आहेर यांची निवड झाल्यानंतर सरपंच पाटे आणि विघ्नहरचे संचालक संतोष खैरे हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विरोबा परिवाराचे सर्वेसर्वा बाळासाहेब पाटे, रोहिदास भुजबळ, रशिद ईनामदार, माजी उपसरपंच आशिष माळवदकर, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, संतोष दांगट, गणेश पाटे, संतोष पाटे, सारिका डेरे, राजेश बाप्ते, रामदास अभंग, रुपाली जाधव, मनिषा मेहेत्रे, कुसुम शिरसाठ, ज्योती दिवटे, अनिता कसाबे, अश्विनी ताजणे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, राजु पाटे, विकास तोडकरी, जयेश कोकणे, अनिल दिवटे, मयुर विटे, निलेश दळवी, संतोष बाळसराफ, सचिन खैरे, अजित वाजगे, भाऊ मुळे, भागेश्वर डेरे, हेमंत कोल्हे, अनिल खैरे, किरण ताजणे, नंदू अडसरे, निलेश जाधव, गौरव खैरे, समीर इनामदार, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
नारायणगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पुष्पाताई आहेर यांची बिनविरोध निवड झाल्यावर त्यांचा सन्मान करताना सरपंच योगेश पाटे आणि विघ्नहरचे संचालक संतोष खैरे व मान्यवर.