मोबाइलमध्ये ॲपकोड लावा अन् मुलांमध्ये बदल पाहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:09 AM2021-04-10T04:09:46+5:302021-04-10T04:09:46+5:30
सुरुवातीला जेव्हा ऑनलाइन शाळा चालू झाली तेव्हा शिक्षकांपासून ते विद्यार्थ्यांमध्ये ताळमेळ लागेपर्यंत अर्धा वेळ निघून जायचा. जाम कॉमेडी वाटत ...
सुरुवातीला जेव्हा ऑनलाइन शाळा चालू झाली तेव्हा शिक्षकांपासून ते विद्यार्थ्यांमध्ये ताळमेळ लागेपर्यंत अर्धा वेळ निघून जायचा. जाम कॉमेडी वाटत होते. बऱ्याच जणांचे स्पीकर चालू राहायचे, घरातल्या गप्पा गोष्टी शाळेच्या क्लास चा एक भाग व्ह्यायच्या. सर्वांनाच सर्व नवीन होते. पण काही दिवसात शिक्षकांनी सर्व सुरळीत केले. शेवटी गुरू ते गुरू. पण माझ्या हळूहळू लक्षात आले की शेवटी हा मोबाईलचा मायाजाल आहे आणि मुलाचे ते कोवळे मन शेवटी त्यात अडकणार. मी मुलावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केले लक्षात आले की तो मोबाइलचा वापर गेम, व्हिडीओ, ॲप डाऊनलोड करून टाईमपाससाठी करत आहे. मी विचार केला की कशाला हवे ऑनलाइन शाळा मुलांना बिघडवायची कामे. पण एक वर्ष वाया जाण्यापेक्षा बरे. मग वरीप्रमाणेच मला एक संकटमोचक मंत्र हाती लागला.
तो असा की सर्व ॲपला पासकोड! फक्त शाळेचा ॲप फ्री टू यूज होता. जेव्हा मी पासकोड घातला तेव्हा मुलगा जरा नाराज झाला पण त्याला मी त्या मागचे फायदे सांगितले, की तुझा मोबाइल कमी वापरल्यामुळे काय डोळे, वेळ आणि स्वतः कसे वाचतो. कधी त्याला वाटले तर घेऊन येतो मोबाईल माझ्याकडे आई मला १० मिनिटांसाठी टाईमपास साठी व्हिडीओ/गेम खेळायची आहे. मीही फक्त १० मिनिट साठी पासवर्ड स्वतः टाकून खेळायला देते.
तुम्हीही ट्राय करा!!
सौ. अनुष्का नीलेश तळेगावकर
८७९३३६७७६८
Attachments area