अधिकाऱ्यांना ठेवले डांबून
By admin | Published: April 18, 2015 11:31 PM2015-04-18T23:31:47+5:302015-04-18T23:31:47+5:30
धानेप (ता. वेल्हे) येथे कानंद, भोसलेवाडी, कोदापूर या गावांच्या गावठाण पुनर्वसनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना फै लावर घेत, धानेप येथील धरणग्रस्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये डांबून ठेवले.
मार्गासनी : धानेप (ता. वेल्हे) येथे कानंद, भोसलेवाडी, कोदापूर या गावांच्या गावठाण पुनर्वसनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना फै लावर घेत, धानेप येथील धरणग्रस्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये डांबून ठेवले. चार तासांनंतर अधिकाऱ्यांकडून लेखी घेतल्यानंतर, त्यांची सुटका करण्यात आली.
१ एप्रिल रोजी धानेप गावातील संपादित जमिनीवर गुंजवणी धरणातील पूर्णत: कठीन, भोसलेवाडी, कानंद, कोदापूर यांचे गावठाण बसविण्यासाठी येथील संपादित शेतजमिनीचे प्लॉटिंग व सपाटीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते; परंतु येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांनीयाबाबत निवेदन देऊन काम थांबविले होते.
या निवेदनामध्ये धानेप गावातील संपादित क्षेत्र हे बुडीत खाणीसाठी संपादित झालेले असून, ते पुनर्वसनासाठी पुन्हा घेऊ नये, खाणीसाठी संपादित केलेल्या जमिनीच्या किमतीतून ६५ टक्के रक्कम शेतकरी कपात करून देत असतानाही शासनाने जमा करून घेतली नाही. त्यामुळे येथील धरणग्रस्त अपात्र ठरले.
पात्र खातेदारांना अद्यापही जमिनी मिळाल्या नाहीत. धानेप गावातील प्रकल्पग्रस्तांचेच धानेप गावामध्ये पुनर्वसन व्हावे, इतर कोणत्याही गावाचे गावठाण धानेपमध्ये होऊ नये, अशा मागण्या या निवेदनामध्ये होत्या.
या निवेदना संबंधीची चर्चा करण्यासाठी नीरा देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता बी. आर. पवार, उपविभागीय अभियंता भरत वायसे, सहायक अभियंता व्ही. डी. नलावडे, शाखा अभियंता बी. क े.ताम्हाणे यांना सुमारे ४ तास ग्रामपंचायत कार्यालयामध्ये थांबवून बाहेरून कुलूप लावण्यात आले होते.
यावेळी धरणग्रस्त सागर मळेकर, ज्ञानेश्वर ओव्हाळ, प्रताप मरळ, शंकर चाळेकर, मारुती चोर, विजय मळेकर, दिनकर गोविलकर, लक्ष्मण मळेकर, निवृत्ती ओव्हाळ, गणपत देवगिरीकर आदी उपस्थित होते.
(वार्ताहर)
४गुंजवणी धरणाच्या पात्रामध्ये येथील कुंभारवाडा गेला असून, तसेच धानेप गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या असून, अद्यापही येथील धरणग्रस्तांना जमिनी मिळाल्या नाही, गुंजवणी धरणामध्ये अशंत: कठीन बुडीत व पूर्णत: बुडीत अशी एकूण नऊ गावे असून, राजकारणामुळे व धरणाचे काम सुरू करण्याच्या हेतून फक्त बुडीत क्षेत्रांतील कानंद, भोसलेवाडी, कोदापूर या गावांच्याच पुनर्वसनाचा विचार केला जातो, इतर गावांतील धरगण्रस्तांचे काय?
४पुरंदरचे आमदार जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी येथील इतर धरणग्रस्तांना पुरंदरमधील गायराने द्यावीत, अन्यथा गुंजवणीच्या पाण्याचा विचार सोडावा, शेवटचा श्वास असेपर्यंत पुनर्वसन झाल्याशिवाय पुरंदरला पाण्याचा एकही थेंब जाऊ देणार नाही, असा इशारा मंत्र्यांना दिला होता. तर धरणाच्या कामासंबंधी व पुनर्वसनासंबंधीच्या सर्व अधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या बैठका या मंत्रालयात न होता, त्या धरणक्षेत्रामध्ये घ्याव्या, अशा अनेक प्रश्नांच्या फैरी अधिकाऱ्यांवर झाडल्या.
४अभियंता पवार यांनी फोनवरून प्रांताधिकारी संजय आसवले यांच्याशी संपर्क साधून, लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. परंतु, लेखी मागणीनुसार कोणताही अधिकार नसताना येथील धरणग्रस्तांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी पवार यांनी प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याशी बैठका घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.