कांदा चाळीत युरिया टाकल्याने कांदा सडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:14 AM2021-08-21T04:14:45+5:302021-08-21T04:14:45+5:30
आधीच बाजारभाव कमी, त्यात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यामुळे शेतकऱ्याला मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. कांदा भरण्यासाठी कामगार आले असताना ...
आधीच बाजारभाव कमी, त्यात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यामुळे शेतकऱ्याला मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. कांदा भरण्यासाठी कामगार आले असताना हा प्रकार उघडकीस आला असून बांगर यांनी कांदाचाळीत जवळपास ३०० पिशवी कांदा साठवून ठेवला होता. त्यापैकी त्यांच्या चाळीच्या तीन कप्प्यांत म्हणजे १५० ते २०० पिशवी कांद्याचे नुकसान झाले असून, त्यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याविषयी बांगर बेल्हा येथील तलाठी कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेले असता कार्यालय बंद होते. दरवर्षी उन्हाळी कांद्याचे भाव सप्टेंबरनंतर वाढीव भाव मिळतील या आशेने बरेचसे शेतकरी जमेल तशा परिस्थितीत चाळीत अथवा शेडमध्ये कांदा साठवून चांगला भाव मिळण्याच्या आशेने थांबलेले असतात. परंतु अशा खोडसाळपणामुळे शेतकरी नाउमेद होऊन नैराश्याकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेतकरी बांगर यांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन गुन्हेगाराला योग्य शासन व्हावे, अशी मागणी केली असून, असाच प्रकार जवळच्या एका शेतकऱ्याच्या बाबतीतही घडला असून, कीटकनाशके फवारण्यासाठी साठवून ठेवलेल्या पाण्यात तणनाशक टाकल्याने जवळपास दोन एकर कांदा जळून गेला होता, अशीही माहिती समोर येत आहे.
200821\img-20210820-wa0212.jpg
कां
कांदा चाळीतच सडलेला कांदा