पीवायसी ‘अ’,‘ब’ संघ विजयी

By Admin | Published: May 11, 2017 04:50 AM2017-05-11T04:50:10+5:302017-05-11T04:50:10+5:30

उपेंद्र मुळे, शौनक शिंदे, कृपाल देशपांडे यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर पीवायसी ‘अ’ आणि ‘ब’ संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा

PYC 'A', 'B' won the team | पीवायसी ‘अ’,‘ब’ संघ विजयी

पीवायसी ‘अ’,‘ब’ संघ विजयी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उपेंद्र मुळे, शौनक शिंदे, कृपाल देशपांडे यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर पीवायसी ‘अ’ आणि ‘ब’ संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पुणे जिल्हा आंतरक्लब टेबल टेनिस स्पर्धेत विजय नोदविला.
पुरुषांच्या एकेरीत पीवायसी ‘अ’ संघाने फ्रॅक ‘अ’ संघाचा ३-० गेमने पराभव केला. उपेंद्र मुळेने आर्चिस कुलकर्णीला ११-८, १३-११, ११-४, शौनक शिंदेने तनय शिंदेला ११-९, ११-७,११-५ तर कृपाल देशपांडेने शंतनू जोशीला ११-२, ११-०, ११-६ असे नमविले.
दुसऱ्या लढतीत पीवायसी ‘ब’ संघाने वायब्रंड ‘ब’ संघाला ३-० गेमने नमविले. शेखर काळेने सलील खालवणकरला ११-३, ११-१, ११-८, सचिन धारवटकरने अमोल कुलकर्णीला ११-४, ८-११, ११-६, ११-५ तर दीपेश अभ्यंकरने अक्षय कोटलवारला ११-५, ११-३, ११-५ असे पराभूत केले.
निकाल :
हिराबाग ‘अ’ वि.वि. शारदा ‘ब’ ३-२ (अनंता हेगडे वि.वि. सलोनी शहा १४-१२, ११-३, ११-६; शौर्य बारकुंड वि.वि. मिथिलेश पंडित ११-८, १०-१२, ११-८, १८-१६; सिद्धान्त भट पराभूत वि. मिहिर ठोंबरे १३-११, ९-११, ११-४, ८-११, १२-१४; शौर्य बारकुंड
पराभूत वि. सलोनी शहा ९-११, ११-८, ९-११, ५-११; अनंता हेगडे वि.वि. मिथिलेश पंडित ११-५, ११-४, ११-४); डेक्कन ‘जे’ वि.वि. एआयएमएस
‘अ’ ३-१ (सुनील शहा वि.वि. संजय पटेल ११-९, ८-११, ११-५,
११-७; जितेंद्र खासनीस
पराभूत वि. रवी कानगे ९-११, ११-५, ७-११, १२-१०, ८-११; नवीश मिश्रा वि.वि. प्रमोद मरकळे ११-५, ११-६, ११-५; सुनील शहा वि.
वि. रवी ११-५, ११-६, ११-६);
शेठिया हॉस्पिटल ‘अ’ वि.वि. सोलारिस ‘ब’ ३-२ (कामेश भोंडे वि.वि. अथर्व चांदोरकर ११-९,
५-११, ११-८, १३-११;
वरद प्रभुणे वि.वि. विलास पाखरे
१४-१२, १४-१२, ११-७; एन. टी. देशपांडे पराभूत वि. श्लोक
धोबाडा २-११, ११-८, ४-११,
५-११; विलास पाखरे पराभूत वि. अथर्व चांदोरकर ७-११, ९-११, ५-११; कामेश भोंडे वि.वि. वरद प्रभुणे ११-५, ५-११, ११-७, ११-४).

Web Title: PYC 'A', 'B' won the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.