सांघिक गटात पीवायसी ‘अ’ चॅम्पियन
By admin | Published: April 24, 2017 05:05 AM2017-04-24T05:05:06+5:302017-04-24T05:05:06+5:30
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित प्रौढांच्या पहिल्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत सेंच्युरी वॉरियर्स ‘अ’ संघाचा ३-०ने सहजपणे पराभव करून
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित प्रौढांच्या पहिल्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत सेंच्युरी वॉरियर्स ‘अ’ संघाचा ३-०ने सहजपणे पराभव करून पीवायसी ‘अ’ संघाने रविवारी विजेतेपदाला गवसणी घातली.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या कम्युनिटी हॉलमध्ये ही स्पर्धा झाली. सांघिक गटाच्या अंतिम फेरीत पीवायसी ‘अ’ने सेंच्युरी वॉरिअर्स ‘अ’वर ३-०ने सहजपणे सरशी साधली. उपेंद्र मुळ्ये आणि रोहित चौधरी या स्टार खेळाडूंनी अप्रतिम खेळ करीत पीवायसी ‘अ’च्या विजेतेपदात निर्णायक योगदान दिले. उपेंद्रने विवेक अलवानीवर ११-६, ५-११, ११-८, १२-१०ने, तर रोहितने सुनील बाबरसवर ११-९, १०-१२, ११-६, ४-११, ११-९ ने मात केली. सुनील बाबरसला दुखापत झाल्यामुळे सुनील-विवेक जोडीने दुहेरी लढतीतून माघार घेतली. यामुळे उपेंद्र-रोहित जोडीला विजयी घोषित करण्यात आले.
तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरींच्या लढतीत पीवायसी ‘अ’ने झुंजार खेळ करीत सोलापूर ‘अ’चे कडवे आव्हान ३-२ने संपुष्टात आणले. यात ३ सामने जिंकणारा रोहित चाध्ौरी पीवायसी ‘अ’च्या विजयाचा शिल्पकार ठरला. दुसऱ्या उपांत्य लढतीत सुनील बाबरसच्या शानदार खेळाच्या जोरावर सेंच्युरी वॉरियर्सने गोमांतक ‘अ’ संघावर ३-१ने मात केली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण अरूण डेव्हलपर्सचे अरूण गुप्ता आणि राज्याच्या महसूल खात्याचे रजिस्ट्रार दिगंबर रौंदाळ यांच्या हस्ते झाले. या वेळी स्पर्धा आयोजन समिती प्रमुख डॉ. प्रमोद मुळ्ये, पीवायसीचे व्यवस्थापन समिती सदस्य गिरीश करंबेळकर, क्लब सेक्रेटरी वसंत चिंचाळकर, प्रोटोकंट्रोल इन्स्ट्रुमेंट्सचे रवींद्र परळे, पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे श्रीराम कोनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
निकाल : सांघिक गट : उपांत्य फेरी : पीवायसी ‘अ’ विवि सोलापूर ‘अ’ : ३-२ (रोहित चौधरी विवि डॉ. नितीन तोष्णीवाल ११-३, ९-११, ११-७, ८-११, ११-३. उपेंद्र मुळ्ये पराभूत वि. मनीष रावत ८-११, ४-११, ११-७, १०-१२. उपेंद्र मुळ्ये-रोहित चौधरी विवि डॉ. नितीन तोष्णीवाल-मनीष रावत ११-६, ११-२, ११-७. उपेंद्र मुळ्ये पराभूत वि. डॉ. नितीन तोष्णीवाल ८-११, ११-९, ९-११, ११-७, १५-१७. रोहित चौधरी विवि मनीष रावत ११-१३, ११-७, ११-५, ५-११, ११-५).
सेंच्युरी वॉरियर्स ‘अ’ विवि गोमांतक ‘अ’ : ३-१ (सुनील बाबरस विवि समीर भाटे ११-८, ११-५, ११-५. विवेक अलवानी पराभूत वि. के. के. रॉय १०-१२, ९-११, २-११. सुनील बाबरस-विवेक अलवानी विवि के. के. रॉय-राम कदम ११-९, ११-९, ११-५. सुनील बाबरस विवि के. के. रॉय ११-९, ९-११, १३-११, ११-८).
अंतिम फेरी : पीवायसी ‘अ’ विवि सेंच्युरी वॉरियर्स : ३-० (उपेंद्र मुळ्ये विवि विवेक अलवानी ११-६, ५-११, ११-८, १२-१०. रोहित चौधरी विवि सुनील बाबरस ११-९, १०-१२, ११-६, ४-११, ११-९. उपेंद्र मुळ्ये-रोहित चौधरी विवि सुनील बाबरस-विवेक अलवानी : बाबरस यांना झालेल्या दुखापतीमुळे त्यांनी सामना सोडून दिला).(क्रीडा प्रतिनिधी)