पीवायसी ‘अ’ संघाचे विजेतेपद हुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 02:23 AM2018-08-28T02:23:21+5:302018-08-28T02:23:39+5:30

प्रौढ राज्य मानांकन टेबल टेनिस : मुनमुन मुखर्जी, अनघा जोशी, प्रकाश केळकर, नितीन तोष्णिवाल आपापल्या गटात अजिंक्य

PYC 'A' team wins title | पीवायसी ‘अ’ संघाचे विजेतेपद हुकले

पीवायसी ‘अ’ संघाचे विजेतेपद हुकले

Next

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबतर्फे आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेनेखाली होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती प्रौढ राज्य मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत पीवायसी ‘अ’ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रविवारी रात्री संपलेल्या या स्पर्धेत अटीतटीच्या अंतिम फेरीत सरशी साधत नाशिकच्या उषाप्रभा ट्रान्सलाईन्स संघाने विजेतेपद प्राप्त केले. वैयक्तिक गटामध्ये मुनमुन मुखर्जी, नितीन तोष्णीवाल, प्रकाश केळकर, सतीश कुलकर्णी, अनघा जोशी, आणि पिनाकिन संपत अजिंक्य ठरले.

पीवायसी क्लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये ही स्पर्धा झाली. सांघिक गटात अंतिम फेरीच्या लढतीत उषाप्रभा ट्रान्सलाईन्स संघाने पीवायसी ‘अ’ संघाला ३-२ने नमविले. विजेत्या संघाकडून पंकज रहाणे, दिव्यांदू चांदूरकर यांनी अफलातून कामगिरी केली. पीवायसी ‘अ’ संघातर्फे उपेंद्र मुळ्ये याने एकेरीच्या दोन्ही लढती जिंकून सामन्यात रंग भरला होता. मात्र, दुहेरीत खेळाडू अपयशी ठरल्याने पीवायसी ‘अ’चे विजेतेपद हुकले.

पुरुषांच्या ४० वर्षांपुढील गटात सातव्या मानांकित पुण्याच्या रोहित चौधरीने सोलापूरच्या अव्वल मानांकित मनीष रावतचा ११-२, ११-७, ९-११, ९-११, ११-४ने नमवून विजेतेपद मिळवले. तर, महिला गटात मुंबई शहरच्या मुनमुन मुखर्जीने पुण्याच्या दुसऱ्या मानांकित चंद्रमा रामकुमारचा ११-६,११-७,११-५ने तर, ५० वर्षांपुढील पुरुष गटात सोलापूरच्या नितीन तोष्णीवालने अव्वल मानांकित पुण्याच्या सुनील बाबरसला ११-७, १२-१४, ११-५ असा धक्का देत विजेतेपद मिळवले. ६० वर्षांपुढील पुरुष गटात मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकित प्रकाश केळकरने पुण्याच्या तिसºया मानांकित अविनाश जोशी यांचा ११-५,११-९,११-७ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. ७० वर्षांपुढील गटात मुंबई शहरच्या पिनाकिन संपतने पुण्याच्या विकास सातारकरचा ११-८, १२-१४, ११-३, ११-९ने नमवून विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी क्लबच्या टेबल टेनिस विभागाचे सचिव गिरीश करंबेळकर आणि विद्या मुळ्ये यांच्या हस्ते झाले. क्लबचे वसंत चिंचाळकर, महाराष्ट्र टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्ष स्मिता बोडस, संयोजन सचिव अविनाश जोशी, दीपक हळदणकर, मधुकर लोणारे, उपेंद्र मुळ्ये, कपिल खरे, राहुल पाठक उपस्थित होते.

निकाल : सांघिक आणि वैयक्तिक गट
सांघिक गट : उपांत्य फेरी : पीवायसी ‘अ’ विवि केआरसी ‘अ’ : ३-० (एकेरी : शेखर काळे विवि तेजस नाईक १०-१२, ८-११, ११-७, ११-९, ११-३; उपेंद्र मुळ्ये विवि सुहास राणे ११-८, ११-७, ११-६; दुहेरी : दीपेश अभ्यंकर-उपेंद्र मुळ्ये विवि सुहास राणे-योगेश देसाई ११-५, ११-६, ११-८).
उषाप्रभा ट्रान्सलाईन्स वि. वि. किंग पॉंग : ३-१.
अंतिम फेरी : उषाप्रभा ट्रान्सलाईन्स वि. वि. पीवायसी : ‘अ’ ३-२ (एकेरी : दिव्यांदू चांदूरकर पराभूत वि. उपेंद्र मुळ्ये ११-७, ६-११, ११-९, १२-१४, ७-११; पंकज रहाणे वि. वि. शेखर काळे ११-६, ११-९, ११-३; दुहेरी : पंकज रहाणे-दिव्यांदू चांदूरकर वि. वि. उपेंद्र मुळ्ये-दीपेश अभ्यंकर ११-७, ७-११, ११-७, ९-११, १३-११; एकेरी : पंकज रहाणे पराभूत वि. उपेंद्र मुळ्ये ६-११, १०-१२, १५-१७; दिव्यांदू चांदूरकर वि. वि. शेखर काळे ११-५, ७-११, ५-११, ११-६, ११-५).
४० वर्षांपुढील पुरुष गट : अंतिम फेरी : रोहित चौधरी (पुणे) वि. वि. मनीष रावत (सोलापूर) ११-२, ११-७, ९-११, ९-११, ११-४. ४० वर्षांपुढील महिला गट : अंतिम फेरी : मुनमुन मुखर्जी (मुंबई शहर) वि. वि. चंद्रमा रामकुमार (पुणे) ११-६, ११-७, ११-५.
५० वर्षांपुढील पुरुष गट : अंतिम फेरी : नितीन तोष्णीवाल (सोलापूर) वि. वि. सुनील बाबरस (पुणे) ११-७, १२-१४, ११-५. ५० वर्षांपुढील महिला गट : अंतिम फेरी : अनघा जोशी (मुंबई शहर) वि. वि. तृप्ती माचवे (ठाणे) ११-७, ११-६, ११-४.
६० वर्षे पुरुष गट : अंतिम फेरी : प्रकाश केळकर (मुंबई उपनगर) वि. वि. अविनाश जोशी (पुणे) ११-५, ११-९, ११-७. ६५ वर्षांपुढील पुरुष गट : अंतिम फेरी : सतीश कुलकर्णी (मुंबई शहर) वि. वि. योगेश देसाई (मुंबई शहर) १३-११, ५-११, ११-४, ६-११, ११-६. ७० वर्षांपुढील पुरुष गट : अंतिम फेरी : पिनाकिन संपत (मुंबई शहर) वि. वि. विकास सातारकर (पुणे) ११-८, १२-१४, ११-३, ११-९.

Web Title: PYC 'A' team wins title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.