पीवायसीच्या दोन संघांची आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 02:27 AM2018-08-26T02:27:47+5:302018-08-26T02:28:20+5:30
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबतर्फे आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती प्रौढ राज्य मानांकन
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबतर्फे आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या
डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती प्रौढ राज्य मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत सांघिक गटात पीवायसीच्या ‘अ’ व ‘क’ या
संघांनी विजयी आगेकूच केली. भंडारा ‘अ’, पीजे हिंदू जिमखाना ‘ब’ या संघांनीही आपापल्या लढती जिंकल्या.
पीवायसी क्लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. सांघिक गटात दुसऱ्या फेरीत उदय गडीकर, राहुल पाठक यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर पीवायसी ‘क’ संघाने सोलारिस संघाचा ३-० ने धुव्वा उडविला.
पीवायसी ‘अ’ संघाने गोरेगाव येथील रॉयल पाल्म्स क्लब संघावर ३-० अशा फरकाने सहजपणे सरशी साधली. विजयी संघाकडून उपेंद्र मुळ्ये, दीपेश अभ्यंकर, शेखर काळे यांनी शानदार कामगिरी केली. अटीतटीच्या लढतीत भंडारा ‘अ’ संघाने मुलुंडच्या बीकेएलपी ‘इ’ संघाचा ३-२ने निसटता पराभव केला. पीजे हिंदू जिमखाना ‘ब’ संघाने नागपूरच्या युनिव्हर्सल ‘अ’ संघाचे आव्हान ३-१ असे मोडीत काढले.
निकाल : सांघिक गट : दुसरी फेरी
पीवायसी ‘क’ वि. वि. सोलारिस : ३-० (एकेरी : उदय गडीकर वि. वि. मंगेश जोशी ११-३, ११-५, ११-४; राहुल पाठक वि. वि. मनोज वाघवेकर ११-१, ११-२, ११-८; दुहेरी : उदय गडीकर-राहुल पाठक वि. वि. मंगेश जोशी-मनोज वाघवेकर ११-४, ११-४, ११-६).
पीजे हिंदू जिमखाना ‘ब’ वि. वि. युनिव्हर्सल ‘अ’, नागपूर : ३-१ (एकेरी : जयंत कुलकर्णी वि. वि. डॉ. जितेंद्र तावरी ११-५, १२-१०, ९-११, १०-१२, १२-१०; सुहास कुलकर्णी वि. वि. अशोक कळंबे १२-१४, ११-४, ११-७, १२-१०; दुहेरी : सुहास कुलकर्णी-पिनाकीन संपत पराभूत वि. रोहिदास गरुड-अशोक कळंबे ११-१३, १०-१२, ११-३, १३-१५; एकेरी : सुहास कुलकर्णी वि. वि. डॉ. जितेंद्र तावरी ११-५, ११-३, १२-१४, ११-९).
भंडारा ‘अ’ वि. वि. बीकेएलपी ‘इ’, मुलुंड : ३-२ .
पीवायसी ‘अ’ वि. वि. रॉयल पाल्म्स क्लब, गोरेगाव : ३-० (एकेरी : उपेंद्र मुळ्ये वि. वि. हितेंद्र निनावे ११-७, ११-५, ११-७; दीपेश अभ्यंकर वि. वि. मनोज दासगुप्ता ११-३, ११-३, ११-६; दुहेरी : दीपेश अभ्यंकर-शेखर काळे वि. वि. हेमेंद्र निनावे-मनोज दासगुप्ता ११-३, ११-७, ११-७).