साबळेवाडी शाळा बंद असूनही दर्जेदार ऑनलाईन उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:09 AM2021-09-25T04:09:30+5:302021-09-25T04:09:30+5:30

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळेच्या बांधकाम दुरूस्तीसाठी तीन लाख रुपये निधी दिला होता. त्यामुळे ...

Quality online activities despite the closure of Sablewadi schools | साबळेवाडी शाळा बंद असूनही दर्जेदार ऑनलाईन उपक्रम

साबळेवाडी शाळा बंद असूनही दर्जेदार ऑनलाईन उपक्रम

googlenewsNext

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळेच्या बांधकाम दुरूस्तीसाठी तीन लाख रुपये निधी दिला होता. त्यामुळे या निधीतून शाळेचे बांधकाम दुरूस्ती करण्यात आली आहे. शाळेचा कायापालट करण्यासाठी गावातील स्थानिक ग्रामस्थांनी लोकसहभागातून शाळेचे छत बदलले आहे. तसेच शाळेला बेंच, संगणक, प्रिंटर, स्मार्ट टीव्ही, टेबल, खुर्च्या, डायस, विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश, शालेय साहित्य, ढोल, ताशा, लेझीम, फॅन, सतरंजी, नेते फोटो असे विविध साहित्य ग्रामस्थांनी स्वेच्छेने दिले आहे.

दरम्यान कोरोना महामारीच्या काळात खेड पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेत स्पर्धा शाळेच्या मुख्याध्यापिका छाया गावडे यांचा प्रथम क्रमांक, वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक, कथाकथन स्पर्धेत द्वितीय क्रमांक, निबंध लेखन स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक आला आहे.शाळेतील शिक्षिका चामले मॅडम यांचा चित्रकला स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक आला आहे.

चौकट : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण कला - क्रीडा महोत्सव स्पर्धेत लोकनृत्य (लहान गट) स्पर्धेत शाळेचा प्रथम क्रमांक आला आहे. तर इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धेत सानिका म्हस्के तालुक्यात द्वितीय आली असून मुंबई माता बालसंगोपन केंद्र आयोजित वक्तृत्व स्पर्धेत राणी शेलार विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

फोटो ओळ : साबळेवाडी (ता. खेड) येथील कायापालट झालेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. (छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)

Web Title: Quality online activities despite the closure of Sablewadi schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.