पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी रस्त्यापर्यंत रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 08:47 PM2018-06-24T20:47:44+5:302018-06-24T20:49:25+5:30

लाेकमत तर्फे अायाेजित पुणेरी पाट्यांच्या प्रदर्शनाला पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या बाहेरील रस्त्यापर्यंत रांग लागली हाेती.

que to the road to see the exhibition of Punei Patya | पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी रस्त्यापर्यंत रांगा

पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी रस्त्यापर्यंत रांगा

googlenewsNext

पुणे : पुणेरी पाट्या या जगभरातील नागरिकांचा चर्चेचा विषय अाहे. मार्मिक शब्दांमधून तिरकसपणे टाेलेबाजी पुणेरी पाट्यांमध्ये नेहमीच पाहायला मिळते. पुणेकरांचे स्वभाव वैशिष्ट्य सांगणाऱ्या या पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन लाेकमतने काेथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात भरविले हाेते. या प्रदर्शनाला पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला. रविवारी संध्याकाळी हे प्रदर्शन पाहण्यासाठी पुणेकरांनी ताेबा गर्दी केली हाेती. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या बाहेरील रस्त्यापर्यंत हे प्रदर्शन पाहण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र हाेते. 


    लाेकमत तर्फे 23 व 24 जून राेजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन अायाेजित केले हाेते. ''पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन पहिल्या मजल्यावर अाहे इथे कुठेही चाैकशी करु नये'' या प्रवेशद्वारावरील पाटी वाचल्यानंतर अातमधील प्रदर्शनात भन्नाट पाट्या वाचायला मिळणार याची अनुभूती रसिकांना येत हाेती. ''अाम्ही चुना फक्त अामच्या पानाला लावताे दुसऱ्यांना लावायचा चुना अाम्ही विकत नाही'', ''बिगर बर्फ रस घेतल्यानंतर बर्फ मिळणार नाही'', ''हे हाॅस्पिटल वेड्यांकरिता असले तरी येथे काम करणारे मात्र शहाणेच अाहेत'', ''येथे हापूसचे भाव फिक्स अाहेत, घासाघासी करु नये अन्यथा पायरी दाखविण्यात येईल'' अश्या असंख्य पाट्या या प्रदर्शनात मांडण्यात अाल्या हाेत्या. प्रत्येक पाटी वाचल्यांतर पुणेकर भरभरुन दाद देत हाेते. अनेकजण या पाट्यांचे फाेटाे अापल्या माेबाईलमध्ये टिपत हाेते तर काहींनी थेट या पाट्यांसाेबत अापले सेल्फी काढून घेतले. 


    रविवारी सकाळपासूनच पुणेकरांनी या प्रदर्शनाला गर्दी केली. दुपारनंतर तर या गर्दीने परमाेच्च टाेक गाढले. रविवारी हे प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्यांची रांग थेट यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या बाहेरील रस्त्यापर्यंत गेली. रस्त्यावरील पदपथावर सुद्धा हे प्रदर्शन पाहण्यासाठी रांगा लागल्या हाेत्या. कितीही वेळ लागला तरी हे प्रदर्शन पाहायचेच असा चंग पुणेकरांनी बांधला हाेता. सर्व वयाेगटातील लाेक या गर्दीत हाेते. तरुणांची संख्याही लक्षणीय हाेती. अात नेमके काय वाचायला मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत हाेती. एका काकूंना तर अाॅस्ट्रेलियावरुन त्यांच्या मुलाने व सूनेने हे प्रदर्शन पाहण्याचा सल्ला दिला व या प्रदर्शनाचे फाेटाे पाढविण्यास सांगितले. सामान्य नागरिकांपासून ते सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या प्रदर्शनाला हजेरी लावत लाेकमतच्या उपक्रमाचे काैतुक केले. संध्याकाळी प्रदर्शन संपण्याच्या वेळीसुदधा रस्त्यापर्यंतच्या रांगा कायम हाेत्या. 

Web Title: que to the road to see the exhibition of Punei Patya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.