वाढीव पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी

By admin | Published: April 2, 2015 05:50 AM2015-04-02T05:50:24+5:302015-04-02T05:50:24+5:30

महापालिकेने २०१५-१६च्या अर्थसंकल्पात वाढीव पाणीपुरवठ्याबाबत कोणताही प्रकल्प प्रस्तावित केलेला नाही. याबाबत संबंधितांची बैठक घेऊन हा प्र

The question of increasing water supply will be resolved soon | वाढीव पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी

वाढीव पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी

Next

पुणे : महापालिकेने २०१५-१६च्या अर्थसंकल्पात वाढीव पाणीपुरवठ्याबाबत कोणताही प्रकल्प प्रस्तावित केलेला नाही. याबाबत संबंधितांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले.
आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महापालिकेने अर्थसंकल्पात वाहतूक, नियोजन, नवे उड्डाणपूल याकरिता तरतूद प्रस्तावित केली आहे.
या अर्थसंकल्पाला राज्य शासना मार्फत मंजुरी देण्यात
येते. त्यापूर्वी पाणीपुरवठ्या
बाबतच्या प्रकल्पांचा निर्णयही लवकरच घेण्यात येईल.

Web Title: The question of increasing water supply will be resolved soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.