भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर महिला नगरसेवक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 06:54 AM2018-05-22T06:54:13+5:302018-05-22T06:54:13+5:30

ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या.

On the question of wandering dogs, female corporator attacked | भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर महिला नगरसेवक आक्रमक

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर महिला नगरसेवक आक्रमक

Next

पुणे : शहरात राजरोस भटकी कुत्री नागरिकांवर हल्ला करतात. महिन्याला हजारो नागरिक गंभीर जखमी होतात. याबाबत प्रशासनाकडून केवळ आकडेवारी सांगितले जाते; परंतु भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. कुत्र्यांपेक्षा माणसांचा जीव स्वस्त झाला का, असा उद्विग्न सवाल करत सोमवारी महापालिकेच्या सभेत बहुतेक सर्वच महिला नगरसेविकांनी आक्रमक भूमिका घेतली.
ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना वेळेवर रेबीज इंजेक्शनही मिळाले नसल्याचे नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. नागरिकांवर हल्ले होत आहे. पालिका प्रशासनाकडून केवळ आकडेवारी सांगितली जाते. कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही. अशा परिस्थितीमध्ये प्राणिमित्र दिल्लीला फोन करतात आणि कारवाई थांबते, अशी टीका एकबोटे यांनी केली.
शहरातील सर्वच भागातील नगसेवकांनी भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर असून, पालिका प्रशासन प्रतिबंधात्मक कारवाई करत नसल्याचा आरोप केला. माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगतिले की, शहरातील भटक्या कुत्र्यांबाबत यापूर्वी पर्यावरण सभा व सर्वसाधारण सभेत अनेक वेळा चर्चा झाली. याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. प्रशासनाकडून नसबंदीबाबत खोटी आकडेवारीदेखील दिली जात आहे. नंदा लोणकर म्हणाल्या की, उपनगरांमध्ये कुत्र्यांचा आणि डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्च होतात; मात्र कारवाई काहीच दिसत नाही.
याबाबत प्रभारी आरोग्यप्रमुख संजीव वावरे यांनी खुलासा करताना सांगितले की, महापालिकेच्या वतीने भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते. मागिल वर्षी यासाठी तब्बल ७२ लाख रुपये खर्च करण्यात आले. यावर्षी तब्बल २ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध असून, ३५ हजार कुत्र्यांची नसबंदी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

नसबंदी केल्यानंतर पिलांना जन्म
महापालिका लाखो रुपये खर्च करून शहरातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करत असल्याचे सांगितले; परंतु आमच्या भागामध्ये नसबंदी केलेल्या कुत्र्यांना पिले झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून देण्यात येत असलेली आकडेवारी फसवी असून, यामुळे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप नगरसेविका कालिंदी पुंडे यांनी केला.

उंदरांसारखा कुत्र्यांचा प्रकार
हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्रालयातील उंदीर मारण्याचा विषय चांगला गाजला. मंत्रालयामधील उंदीर मारण्यासाठी प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले. त्याचप्रमाणे महापालिका कुत्र्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करत असून परिस्थिती नियंत्रणात येत नाही. त्यामुळे मंत्रालयातील उंदरांप्रमाणे महापालिकेतील कुत्र्यांचा प्रकार झाला असल्याचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी सभागृहात सांगितले.
 

Web Title: On the question of wandering dogs, female corporator attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.