तरुणांच्या संकल्पनेतून मिटला वन्यप्राण्यांच्या चारापाण्याचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:08 AM2021-03-30T04:08:04+5:302021-03-30T04:08:04+5:30

भोर तालुक्यातील तीर्थक्षेत्र मांढरदेवी परिसरातील डोंगरातील वन्यप्राणी चारापाण्यावाचून वंचित राहात आहेत ही बाब लक्षात येताच पूर्व हवेेेलीतील आळंदी म्हातोबाची ...

The question of wildlife fodder has disappeared from the concept of youth | तरुणांच्या संकल्पनेतून मिटला वन्यप्राण्यांच्या चारापाण्याचा प्रश्न

तरुणांच्या संकल्पनेतून मिटला वन्यप्राण्यांच्या चारापाण्याचा प्रश्न

Next

भोर तालुक्यातील तीर्थक्षेत्र मांढरदेवी परिसरातील डोंगरातील वन्यप्राणी चारापाण्यावाचून वंचित राहात आहेत ही बाब लक्षात येताच पूर्व हवेेेलीतील आळंदी म्हातोबाची येथील सचिन माथेफोड व कुंजीरवाडी गावातील प्रमोद सावंत यांनी परिसरातील एव्हरेस्ट स्पन पाईपचे अधिकारी अविनाश जगताप यांच्याशी संपर्क साधला व डोंगर परिसरात वन्यप्राण्यांचसाठी पाणवठा तयार करण्याचे ठरविले.

अविनाश जगताप यांनी त्वरित विनामोबदला सिमेंटची टाकी तयार करून दिली. यावेळी वनविभागाचे अधिकारी विशाल अडागळे, अशोक चव्हाण व म्हस्के यांनी शासकीय नियमाच्या परवानग्यांची तातडीने परवानगी दिली. या कामासाठी स्थानिक तरुण हरीश गोठे, विशाल वायकर, सुमित चव्हाण, राज मदने, विजय रणदिवे यांनी मोलाचे सहकार्य मिळाले.

--

२९लोणीकाळभोर अन्न पाण्याची व्यवस्था

लोणीकाळभोर येथी पक्ष्यांस्ाठी अन्नपाणी व घरट्यांची व्यवस्था करताना तरुण

.

Web Title: The question of wildlife fodder has disappeared from the concept of youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.