बोपखेलवासियांच्या रस्त्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
By Admin | Published: July 29, 2015 12:49 AM2015-07-29T00:49:11+5:302015-07-29T00:49:11+5:30
बोपखेलवासियांसाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात येत असलेल्या पर्यायी रस्त्यावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा रस्ता खडकी अॅम्युनेशन फॅक्टरीच्या संरक्षण
पुणे : बोपखेलवासियांसाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात येत असलेल्या पर्यायी रस्त्यावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा रस्ता खडकी अॅम्युनेशन फॅक्टरीच्या संरक्षण भिंती जवळून जात असल्याने त्यावर फॅक्टरी प्रशासनाने हरकत घेतली आहे. त्यामुळे रस्त्याबाबत पुन्हा पेच निर्माण झाला आहे.
दापोडी येथून बोपखेलकडे जाणारा वहिवाटीचा रस्त्यासंदभार्त प्रगती होत असतानाच आता खडकी येथील अॅम्युनिशन फॅक्टरीने त्याला हरकत घेतली आहे. नियोजित पयार्यी रस्त्याचा काही भाग हा अॅम्युनिशन फॅक्टरीपासून १८० मीटर अंतरावरून जातो. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहू शकतो, असे फॅक्टरीच्या प्रतिनिधीने म्हटले आहे. यासंदर्भात फॅक्टरीच्या वरिष्ठांकडे रस्त्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. यापूर्वी सीएमईने मूळ रस्त्याला हरकत घेतल्यानंतर हा नियोजित पयार्यी रस्ता योग्य ठरेल, असे फॅक्टरीच्याच प्रतिनिधींकडून सुचविण्यात आले होते. मात्र, आता फॅक्टरीने हरकत घेतल्याने पेच निर्माण झाला आहे. येत्या शुक्रवारी या विषयावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे.