ज्ञानप्रबोधिनीच्या युवक विभागाने कोरोनावर तयार केली प्रश्नावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 08:52 PM2020-04-13T20:52:36+5:302020-04-13T20:53:50+5:30

आतापर्यंत सुमारे 1000 जणांनी घेतला उपक्रमात सहभाग

Questionnaire prepared on the Corona by the Youth Department of dnyanprabodhini | ज्ञानप्रबोधिनीच्या युवक विभागाने कोरोनावर तयार केली प्रश्नावली

ज्ञानप्रबोधिनीच्या युवक विभागाने कोरोनावर तयार केली प्रश्नावली

googlenewsNext
ठळक मुद्दे  लोकांनीच ही प्रश्नमंजूषा सोडवून स्वत: ला सध्यस्थितीबद्दल किती माहिती आहे हे तपासावे

पुणे :  कोरोना हा आजार कसा होतो? त्याची लक्षणे काय? आजार झाल्यावर काय करावे? असे वेगवेगळे प्रश्न सध्या लोकांना भेडसावत आहेत...यामुळे कुठेतरी  लोकांच्या मनात कोरोनाविषयी अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. त्यांच्या याच शंकांचे निरसन व्हावे आणि त्यांना कोरोनाची परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी ज्ञान प्रबोधिनी युवक विभागातर्फे विशेष प्रश्नावली तयार करण्यात आली असून, त्याद्वारे विविधांगी प्रश्न विचारुन लोकांना या आजाराची शास्त्रशुद्ध माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
       लोकांनीच ही प्रश्नमंजूषा सोडवून स्वत: ला सध्यस्थितीबद्दल किती माहिती आहे हे तपासावे हा यामागचा उद्देश आहे.  ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या युवक विभागाने  कोरोना आजाराबद्दल गुगल फॉर्मवर ही प्रश्नावली तयार केली आहे. त्याची लिंक सोशल मीडियावर पाठविण्यात येत असून, त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ही कोणतीही स्पर्धा नसून, लोकांना या आजाराबद्दलची खरी माहिती मिळावी इतकाच हेतू  असल्याचे युवक विभागाचे अनिरुद्ध वाघ यांनी ' लोकमत' शी बोलताना सांगितले. युवक विभागातील काही तरुण कार्यकर्ते आणि डॉक्टरांनी एकत्र येऊन ही प्रश्नावली तयार करण्याचे काम केले आहे.
     वाघ म्हणाले,ज्ञान प्रबोधिनीच्या युवक विभागाची शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २० दलं चालतात. त्या सर्व दलांवर मिळून सुमारे ८००-९०० मुलं व युवक दैनंदिन किंवा साप्ताहिक रीतीने खेळायला / चर्चा करायला जमतात. करोनापरिस्थितीमुळे सगळे घरी बसून असले तरी व्यायाम व चर्चासत्रं आणि अनेक उपक्रम आॅनलाईन पद्धतीने चालू आहेत. जेव्हा या दलांवर करोनाबद्दल बोलणे सुरू झाले तेव्हा असे लक्षात आले की, ह्लया विषयावर माहितीचा पुष्कळ मारा होत असतो. प्रसारमाध्यमं व समाजमाध्यमांमध्ये पुष्कळ माहिती येतही असते. माहिती समोर येणं आणि माहितीवर विचार होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला आपण पाहतो किंवा वाचतो ते उमजलेलं आहे का नाही याबद्दल तपासायला हवं असं वाटल्यामुळे आधी दलांवरच्या मुलांसाठी अशी प्रश्नमंजूषा तयार करू या असं वाटलं.ह्व
मात्र जसं जसं काम सुरू केलं तसं इतरांपर्यंतही ती पोहोचविण्याचे आम्ही ठरविले आणि लोकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
......

अशी केली प्रश्नमंजूषा तयार
कोरोनाबद्दल चुकीची, अनावश्यक, न तपासलेली माहिती जाऊ नये याची दक्षता घेण्यात आली. जागतिक आरोग्य संघटना, केंद्रीय आरोग्य मंत्रालय व अन्य मंत्रालयं यांच्या अधिकृत संकेतस्थळांवरून अथवा प्रसारमाध्यमांसाठी दिलेल्या निवेदनांमधून जी माहिती उपलब्ध आहे तेवढेच प्रश्न या प्रश्नमंजूषेत घालण्यात आले. प्रश्न व उत्तरं तयार केल्यानंतर डॉ. निखिल साठे,  असीम औटी (जीवशास्त्र/ मायक्रोबायलॉजी प्राध्यापक), डॉ. ऐश्वर्य सुपेकर यांच्याकडून प्रश्नांच्या रचनेबद्दल तपासणी केली. या प्रश्नमंजूषेत फक्त आजारापुरती माहिती घालायची नाही असंही ठरवलं. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, समाजजीवनावर परिणाम होईल याचीही जाणीव युवकांना सतत असायला हवी. म्हणून त्यासंदभार्तील प्रश्नही घातले. तेही सनदी लेखापालांकडून (उँं१३ी१ी िअूूङ्म४ल्ल३ंल्ल३) कडून तपासून घेतले. सध्या रक्तदानाचा तुटवडा आहे, म्हणून अनेक रक्तपेढ्या वैयक्तिकरीत्या रक्तदात्यांना बोलावून घेत आहेत. तसे बोलावणे सोपे जावे म्हणून रक्तदानासंबंधी आवाहनही प्रश्नमंजूषेच्या शेवटी ठेवले आहे.  प्रश्नमंजूषेमध्ये एकूण 22 प्रश्न आहेत. ती सोडवायला 15 ते 20 मिनिटे लागतात, अशी माहिती अनिरुद्ध वाघ यांनी  दिली.
....
इथे सोडवा प्रश्नमंजूषा
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSff4TeV9eN1grG1Thpkv5oPMOZxtam62Koc-zBDljYGPHVaaw/viewform?usp=sf_link
........

Web Title: Questionnaire prepared on the Corona by the Youth Department of dnyanprabodhini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.