लोकसहभागातून सुटतील प्रश्न
By admin | Published: February 21, 2017 02:35 AM2017-02-21T02:35:54+5:302017-02-21T02:35:54+5:30
ग्रामीण भागातल्या औद्योगिक क्षेत्रांची प्रगती योजनाबद्ध रितीने झालेली नाही. योजना व अंमलबजावणी यामध्ये असलेल्या तफावतीमुळे
तळेगाव दाभाडे : ग्रामीण भागातल्या औद्योगिक क्षेत्रांची प्रगती योजनाबद्ध रितीने झालेली नाही. योजना व अंमलबजावणी यामध्ये असलेल्या तफावतीमुळे प्रश्न निर्माण होत आहेत. लोकसहभागाने बरेच प्रश्न सुटतील, असे मत डॉ. संजय कप्तान यांनी व्यक्त केले.
मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचालित, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात गुणवत्ता सुधार योजनेतंर्गत वाणिज्य विभागाच्या वतीने ‘ग्रामीण भागातील औद्योगिक विकासातील आव्हाने’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर बीजभाषक डॉ. एस. व्ही. कडव्हेकर , सत्राचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय बाळसराफ, संस्थेचे उपाध्यक्ष यादवेंद्र खळदे, प्रा. वसंत पवार व महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्या स्नेहल बाळसराफ व प्रभारी प्राचार्य व चर्चासत्राचे आयोजक प्रा. श्रीकांत महाजन आदी उपस्थित होते.
डॉ. कडव्हेकर म्हणाले, ‘‘ग्रामीण भागात औद्योगिकीकरण वेगाने होऊ शकते. कारण तिथे विचारांचा भ्रष्टाचार तुलनेने कमी आहे. गरज आहे व्यावसायिक दृष्टिकोन बाळगण्याची.’’
अध्यक्षीय मनोगतात डॉ. बाळसराफ यांनी स्वत:चा उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले. नंतरच्या सत्रांमध्ये अर्चना आहेर, डॉ. अश्विनी सोवनी या प्रमुख वक्त्यांनी विचार मांडले. डॉ. जे. डी. टाकळकर व डॉ. ए. एम. अग्रवाल सत्राचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
प्रा. श्रीकांत महाजन यांनी प्रास्ताविक केले. प्रा. किसन पाटील व प्रा. अशोक कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विनया केसकर यांनी आभार मानले. प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी चर्चासत्राचे आयोजन केले.(वार्ताहर)