खोरला लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:22+5:302021-07-16T04:08:22+5:30
खोरच्या परिसरात कोरोनाची पहिली लस आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांना देण्यात आली. त्यानंतर गुरुवारी दुसरे लसीकरण करण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली ...
खोरच्या परिसरात कोरोनाची पहिली लस आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांना देण्यात आली. त्यानंतर गुरुवारी दुसरे लसीकरण करण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. दिवसाला २०० ग्रामस्थांना हे लसीकरण होणार आहे. मात्र, त्यापेक्षाही जास्त ग्रामस्थ लसीकरणासाठी आल्याने त्यांना भर उन्हात ताटकळत उभे राहून लस घ्यावी लागली. ग्रामीण भागामध्ये कोरोनाच्या रोगाने सामान्य नागरिकांना चांगलेच धास्तीवर घेतले असल्याने ग्रामस्थांनी या रोगापासून बचाव करण्यासाठी शेतातील कामे सोडून या लसीकरण करण्याला प्रथम प्राधान्य दिले आहे. पावसामुळे शेतातील कामे आता सध्या जोर धरू लागली असताना देखील ग्रामस्थांनी लसीकरण करण्याचा हक्क बजावला आहे.
फोटोओळ : खोर (ता. दौंड) येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात कोरोनाची लस घेण्यासाठी ग्रामस्थांनी केलेली गर्दी.