हवेली तालुक्यातील पुर्व भागातील गावात सकाळ पासूनच रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:15 AM2021-01-16T04:15:56+5:302021-01-16T04:15:56+5:30

उत्साह चांगला होता नवमतदार यांच्या कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मशीन बंद पडणे, मतदार यादीत नाव नसणे, दुबार मतदार , ...

Queues in the eastern part of Haveli taluka since morning | हवेली तालुक्यातील पुर्व भागातील गावात सकाळ पासूनच रांगा

हवेली तालुक्यातील पुर्व भागातील गावात सकाळ पासूनच रांगा

Next

उत्साह चांगला होता नवमतदार यांच्या कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मशीन बंद पडणे, मतदार यादीत नाव नसणे, दुबार मतदार , अशा तक्रारी नगन्य होत्या. मात्र मतदार टक्के वारी वाढली नाही. दुपारी १२ वाजे पर्यंत मतदानाचा वेग होता. दुपारी कडक उन्हामुळे मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती,

सकाळी ९ वा जेपर्यंत ६ टक्के मतदान झाले. केसनंद गावामध्ये ९६२६ मतदार आसून ९ जागा बिनविरोध झाल्या आहे तर वार्ड क्रमांक ५ मध्ये परस्पर विरूध्द उमेदवार मध्ये समजोता झाल्याने फक्त मतदान प्रक्रीया पुर्ण करण्याचे काम चालले होते तर वार्ड क्रमांक दोन मध्ये २ जागेसाठी ५ उमेदवार तसेच वार्ड क्र. २ मध्ये १ जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात असून येथेच लढत आहे. निवडणूक चित्र आदीच स्पष्ट झाल्याने कार्यकर्ते व मतदार मध्ये पाहीजे असा उत्साह नव्हता. केसनंद - सकाळी ९ वाजेपर्यंत २४ टक्के ११ वाजेपर्यंत ३४ टक्के, सायकाळी ५.३० वाजेपर्यंत ९२ टक्के , बकोरी- १७८० - १५६ - २८५ , डोंगरगाव ९१ टक्के मतदा झाले वढु खुर्द - प्रभाग १ -- २५३ पैकी२०८ प्रभाग २--५४८ पैकी ४२५ प्रभाग ३ -- १२२४ पैकी ८५३ असे मतदान झाले आहेत.

केसनंद (ता.हवेली) येथे सकाळी मतदान केंद्रावर गर्दी पहायला मिळाली .

Web Title: Queues in the eastern part of Haveli taluka since morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.