लसीकरणासाठी सकाळपासूनच रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:12 AM2021-05-06T04:12:29+5:302021-05-06T04:12:29+5:30
लसीकरणासाठी सकाळपासूनच रांगा शहरातील अनेक लसीकरण केंद्रांबाहेर आज सकाळी किंबहुना पहाटेपासूनच काही ठिकाणी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या़ परिणामी, ...
लसीकरणासाठी सकाळपासूनच रांगा
शहरातील अनेक लसीकरण केंद्रांबाहेर आज सकाळी किंबहुना पहाटेपासूनच काही ठिकाणी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या़ परिणामी, लसीकरण केंद्रांवरील प्रमुखांनी उपस्थित नागरिकांना टोकन देऊ केले़ आज प्रत्येक लसीकरण केंद्राला साधारणत: १०० ते १२५ डोस प्राप्त झाले होते़ त्यानुसार हे टोकन वाटप झाले, पण प्रत्यक्षात उपस्थिती ही ५०० ते ६०० नागरिकांची होती़ यामुळे अनेकांना केवळ टोकन देऊन गुरुवारी येण्यास सांगण्यात आले आहे़ आजच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा विशेषत: दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या जास्त दिसून आली़. पण, लसीअभावी सर्वांना लस मिळाली नाही़
---
गुरुवारी ७० लसीकरण केंद्रांवर लसीकरण
शहरात गुरुवारी १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण नियोजित केलेल्या ५ केंद्रांवर सुरू राहणार आहे़ तर, ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण एकूण ७० केंद्रांवर होणार आहे़ तसेच ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करताना संबंधित केंद्रांवर उपलब्ध डोसमधून ७०% हे पहिला, तर ३०% दुसरा डोस म्हणून दिला जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली़