वाल्हे येथील बँकेत पैसे भरण्यासाठी लागल्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:12 AM2021-03-31T04:12:36+5:302021-03-31T04:12:36+5:30
आर्थिक वर्षाची अखेर असल्याने कर्जाचे हप्ते भरणे, पीक कर्ज सोसायटी, वीजबिल भरणा आदी कारणासाठी पैसे काढणे, यासाठी बँकांमध्ये ग्राहकांच्या ...
आर्थिक वर्षाची अखेर असल्याने कर्जाचे हप्ते भरणे, पीक कर्ज सोसायटी, वीजबिल भरणा आदी कारणासाठी पैसे काढणे, यासाठी बँकांमध्ये ग्राहकांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या.
वाल्हे येथे बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तसेच पतसंस्थांमध्ये व्यापारी, विविध खात्याचे कर्मचारी, विद्यार्थी, सेवानिवृत्त तसेच परिसरातील शेतकरी यांचा आर्थिक संबंध असल्याने ते आर्थिक व्यवहारासाठी येत असतात.
बँकांना आर्थिक वर्षासाठी मार्च अखेर महिना महत्वाचा असतो. गर्दीमुळे मोठी रांग लागत असल्याने अनेकांनी निराश होऊन घरी जाणे पसंद केले.ग्राहकांच्या तक्रारी नंतर जिल्हा बॅंक व महारास्ट्र बँकेच्या वाल्हे येथील शाखे बाहेर सावलीची सोय केली होती. परंतु गर्दी जास्त वाढल्यामुळे गर्दीमुळे ग्राहकांची रांग थेट रस्त्यापर्यंत पोचली होती.
दरम्यान, मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन होते. आताही कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तरीही शासनाच्या वतीने वीजबिलाची वसुलीची मोहीम राबवत असल्याने परिसरातील शेतकरीवर्ग मोठ्या आर्थिक संकट सापडत आहे. शासनाच्या वतीने पीक कर्ज भरण्यासाठी व वीजबिल भरण्यासाठी पुढील महिनाभर तरी सवलत द्यावी. त्यामुळे येथील शेतकरीवर्गाला थोडा दिलासा मिळेल. अशी चर्चा बॅकेत आलेल्या ग्राहकांमध्ये होत होती.