कोट्स - रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:10 AM2021-07-15T04:10:23+5:302021-07-15T04:10:23+5:30
- सचिन गाढवे, संचालक, काका हलवाई स्वीट सेंटर, पुणे ----------------------------------------------- कोरोनाकाळात सर्वत्र रक्ताचा तुडवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘लोकमत’चा ...
- सचिन गाढवे, संचालक, काका हलवाई स्वीट सेंटर, पुणे
-----------------------------------------------
कोरोनाकाळात सर्वत्र रक्ताचा तुडवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘लोकमत’चा रक्तदानाचा उपक्रम अनेकांना जीवदान देणारा ठरेल. प्रत्येकाने रक्तदान करून या उपक्रमात सहभागी व्हावे.
- राजेश देशपांडे, अध्यक्ष, बाणेर-बालेवाडी मेडिकल असोसिएशन
-----------------------------------------------
सध्या संपूर्ण जगात आरोग्याचे संकट उभे राहिले आहे. हे संकट दूर करण्यासाठी प्रत्येकाने वाटा उचलण्याची गरज आहे. ‘लोकमत’ने रक्तदान उपक्रम हाती घेऊन कोरोना संकट दूर करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला आहे.
- डाॅ. पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, परिमंडल-४
-----------------------------------------------
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे प्रत्येकाने ‘लोकमत’च्या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे. सध्या रक्ताची गरज असल्यामुळे रक्तदान करणे काळाची गरज आहे.
- विनय आऱ्हाना, व्यवस्थापकीय संचालक, रोझरी फाऊंडेशन, पुणे
--------------------------------------------------------------
कोरोना संकटात रक्तदान करणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे अनेकांचे जीव वाचणार आहेत. ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या उपक्रमाचे सर्वांनी अनुकरण करावे. प्रत्येकाने रक्तदान करावे.
- प्रशांत दाता, संचालक, लक्ष्मीनारायण चिवडा, पुणे