Pune Heavy Rain: खडकवासला धरणातून सायंकाळी ४ वाजता ३५,५७४ क्यूसेसने पाणी सोडणार; प्रशासन अलर्ट मोडवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 14:47 IST2024-07-25T14:45:57+5:302024-07-25T14:47:48+5:30
पुण्यात पावसाने धुमाकूळ घातला असून अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे

Pune Heavy Rain: खडकवासला धरणातून सायंकाळी ४ वाजता ३५,५७४ क्यूसेसने पाणी सोडणार; प्रशासन अलर्ट मोडवर
पुणे: पुण्यात पावसाचा हाहाकार सुरु आहे. संपूर्ण शहरात पावसाने धुमाकूळ घातलाय. काल रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग सुरु आहे. आता पुन्हा पावसाने जोर धरल्याने मुठा नदी पात्रामध्ये सायंकाळी ४ वाजता ३५,५७४ क्यूसेस करण्यात येणार असल्याचे पाठबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा सायकाळी ४ते 6:00वा. 35574 क्यूसेक्स करण्यात येत आहे. तसेच धरण परिसरात 100 mm व घाटमाथ्यावर 300 mm पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो असेही त्यांनी जाहीर केले आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी. पुणे महानगरपालिका प्रशासनाने सतर्क राहून योग्य ती खबरदारी त्वरित घ्यावी अशी सूचना पाटबंधारे विभागाकडून करण्यात आली आहे.
संबंधित ठिकाणी जाण्यास प्रतिबंध केला आहे
-भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे .
- गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर .
- शितळा देवी मंदिर डेक्कन.
- संगम पूल पुलासमोरील वस्ती
- कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्याची दक्षता घ्यावी.
- होळकर पूल परिसर