अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिके खराब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:28 AM2021-02-20T04:28:33+5:302021-02-20T04:28:33+5:30
मागील आठवड्यापासून तालुक्यात ढगाळ वातावरण तयार होत होते. ढगाळ हवामानामुळे हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यातच ...
मागील आठवड्यापासून तालुक्यात ढगाळ वातावरण तयार होत होते. ढगाळ हवामानामुळे हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यातच अवकाळी पावसाची भर पडल्याने ज्वारी, गहू, हरभरा, आंब्याचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने ज्वारी व गहू तसेच जनावरांचा चारा शेतातच काळे पडून खराब होणार आहे. तर उभी पिके असलेल्या शेतीत पाण्याची तळी साचल्याने पिके कुजून जाण्याची शक्यता आहे. तालुक्यातील शेतकरी वर्ग कोरोनाच्या महामारीतून सावरत असतानाच कापणीस आलेल्या रब्बी पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी जगावे की मरावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यंदा रब्बीतील पिके जोमात आल्याने उत्पन्नात वाढ होणार असल्याचे चित्र होते. मात्र, ढगाळ हवामानाच्या लहरीपणामुळे व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील बळीराजा धास्तावून गेला आहे.
फोटो : अवकाळी पावसामुळे भुईसपाट झालेल्या रब्बीतील पीक.