अवकाळीमुळे रब्बीचे ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 06:23 AM2020-01-25T06:23:06+5:302020-01-25T06:23:39+5:30
खरिपामध्ये अतिवृष्टीने झोडपल्यानंतर रब्बीतही अवकाळी पावसामुळे तब्बल ७१,२६३ शेतमालाचे नुकसान झाले
पुणे : खरिपामध्ये अतिवृष्टीने झोडपल्यानंतर रब्बीतही अवकाळी पावसामुळे तब्बल ७१,२६३ शेतमालाचे नुकसान झाले, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. कापूस, तूर, हरभरा, गहू, ज्वारी, संत्रा, मोसंबी, आंबा आणि भाजीपाला पिकाचे अधिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावे, असे आदेश दिल्याचे नैसर्गिक आपत्ती विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील खरिपाच्या तब्बल ९४ लाख ५३ हजार १३९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. त्यात भात, ऊस, फळे आणि भाजीपाला पिकाचा समावेश होता. २४ डिसेंबर २०१९ ते ३ जानेवारी या दरम्यान अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचाबहुतांश भाग आणि विदर्भातील काही भागालाही फटका बसला.
३१ डिसेंबर ते ३ जानेवारीत बाधित झालेल्या पिकांमध्ये कापूस, तूर, हरभरा, गहू, ज्वारी, संत्रा, मोसंबी, आंबा आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले.