Pune Crime: बेल्ह्यात दोन गटांत राडा; ६१ जणांवर गुन्हे दाखल, ६ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 13:38 IST2023-12-01T13:37:46+5:302023-12-01T13:38:31+5:30
आळेफाटा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल...

Pune Crime: बेल्ह्यात दोन गटांत राडा; ६१ जणांवर गुन्हे दाखल, ६ जणांना अटक
आळेफाटा (पुणे) : जेवण करून मंदिरात बसण्यासाठी जात असलेल्या २८ वर्षीय तरुणावर सुमारे ३० जणांच्या जमावाने लोखंडी रॉड तसेच लाकडी दांडक्याने डोक्यास व पाठीवर जबरी मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात गुरुवारी (दि.३०) रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत अंकित ज्ञानेश्वर शिरतर (रा. श्रीराम चौक, बेल्हे, ता. जुन्नर जि. पुणे) याने दिलेल्या फिर्यादीवरून हुसेन बेपारी, मिराज नजीर बेपारी, पापा कुरेशी, अकिब नासीर बेपारी, सदाम कुरेशी, समिर कुरेशी, शाकीर बशीर बेपारी, अनसअली शराफत अली, जाकीर बेपारी, इम्रान कुरेशी व इतर १५ ते २० जण (सर्व रा. बेल्हे, ता. जुन्नर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आकिब नासिर बेपारी, मिराज नजीर बेपारी, समीर कादर बेपारी यांना अटक केली आहे.
दुसरी फिर्याद हुसेन नजीर बेपारी (वय-17 वर्षे,रा. चांदणी चौक ,बेल्हे ता. जुन्नर जि. पुणे) याने दिली असून त्याचे चुलते समीर कादर बेपारी हे दुचाकीवरून जात असताना गावातील फिरोज इनामदार व अनुष डावखर यांनी त्यांना कट का मारला असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. या झालेल्या वादातून हुसेन बेपारी व घरातील सदस्यांना ३१ जणांनी लाठ्या व दगडांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत लोल्या उर्फ रियाज फिरोज इनामदार, अनुज डावखर, अंकेत शिरकर, सागर ज्ञानेश्वर शिरतर, गणेश मसू गफले, प्रशांत जालिंदर बंडलकर, निलेश रामदास शिरतर, दर्शन दिलीप शेरकर, स्वप्निल बन्सी बोराडे, विपुल दिलीप शिरतर, किरण गंगाराम मंडले, सुरज लक्ष्मण शिरतर, बाबू उर्फ प्रशांत धनवटे, अथर्व संजय भुजबळ, मन्या उर्फ विकास भुजबळ, चक्क्या उर्फ विकास शिरतर व इतर १० ते १५ जण (सर्व रा. बेल्हे, ता, जुन्नर, जि, पुणे) यांच्याविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी प्रशांत जालिंदर भंडलकर,आकाश उर्फ सागर ज्ञानेश्वर शिरतर, गणेश मसु गफले यांना अटक केली असून इतरांचा शोध घेणे कामी पोलीस पथके रवाना केली आहेत. गुरुवारी रात्रभर बेल्हे गावात दोन्ही गटात रहाडा सुरु होता. आळेफाटा पोलिसांनी आज शुक्रवारी बेल्हे गावत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला असून गावात तणावपूर्ण शतता आहे.