राडारोडय़ातही शोधला जातोय संसार
By Admin | Published: October 31, 2014 11:44 PM2014-10-31T23:44:00+5:302014-10-31T23:44:00+5:30
न:हे येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर अवघ्या तासाभरातच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
पुणो : न:हे येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर अवघ्या तासाभरातच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या पथकाने सूर्याचा पहिला किरण उगवताच पोकलेन, जेसीबी आणि डंपरच्या मदतीने या इमारतीचा राडारोडा उचललला जात होता. हा राडारोडा या इमारतीच्या समोरील बाजूस असलेल्या एका मोकळ्या मैदानात टाकला जात होता. जसजसा दिवस वर जात होता, तसतसा या राडारोडय़ाचा ढीगही वाढत होता. मात्र, या राडारोडय़ात या इमारतीमधून स्वत:चा जीव वाचवून बाहेर पडलेला प्रत्येक जण आपला संसार शोधताना दिसत होता.
दुर्घटनेच्या दिवशी या इमारतीत आठ कुटुंबे राहत होती. त्यातील 2 घरमालक, तर 6 भाडेकरू होते. अवघ्या चार दिवसांपूर्वी दिवाळीचा सण साजरा करून या प्रत्येक घरातील रहिवासी सुटी घालवीत होते. मात्र, शुक्रवारी पहाटे झालेल्या या दुर्घटनेने प्रत्येकाचाच संसार उद्ध्वस्त झाला. त्यात कोणाच्या घराची तसेच बँकेची कागदपत्रे होती, तर कोणाच्या मुलांची शैक्षणिक कागदपत्रे होती. कोणाचे दागिने होते, तर कोणी नव्याने उभारलेला संसार होता. जसजसे एनडीआरएफचे जवान हा राडारोडा काढत होते. तसतशा या वस्तू ढिगा:याखालून बाहेर येत होत्या. त्यातील आपल्या वस्तू पाहून आणि त्या ओळखून त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. तर, अनेक रहिवासी पुढे जाऊन या वस्तू ताब्यात घेऊन त्या सुस्थितीत आहेत का, याची तपासणी करताना दिसत होते. आपली वस्तू पुन्हा सापडल्याचा आनंदही त्यांच्या चेह:यावर काही वेळ हास्य आणत होता. मात्र, नजर कोसळलेल्या इमारतीकडे जाताच त्याच्या चेह:यावर पुन्हा एकदा दु:खाचे सावट दिसत होते.
(प्रतिनिधी)