रस्त्यावरील राडारोड्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:13 AM2021-09-10T04:13:57+5:302021-09-10T04:13:57+5:30
चाकण ते वासुली फाटा या दरम्यानच्या रस्त्याचे हायब्रीड ऍन्युटी कार्यक्रमांतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले ...
चाकण ते वासुली फाटा या दरम्यानच्या रस्त्याचे हायब्रीड ऍन्युटी कार्यक्रमांतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र, अनेक ठिकाणी किरकोळ कामे अपूर्ण आहेत.ती कामे पूर्ण करण्यासाठी वासुली फाट्यावर रस्त्यालगत व्यावसायिक गाळ्यासमोर मागील दोन महिन्यांपासून खोदाई करून ठेवली आहे. संथगतीने सुरू असलेल्या या कामामुळे सतत वाहतूककोंडी होते.व्यावसायिकांना याचा फटका बसत आहे. खोदाई करण्यात आलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साठून रोगराई पसरली जात आहे.
रस्त्याच्या लगत मोठ्या खड्ड्यांची खोदाई करण्यात आली आहे. सगळा राडारोडा रस्त्यावर टाकण्यात आला आहे. शेजारीच व्यावसायिक गाळे आणि पथारी व्यावसायिक बसलेले असतात. वासुली फाटा औद्योगिक वसाहतीमधील एक मुख्य बाजारपेठ असल्याने सतत ग्राहकांची येथे रेलचेल असते. खोदाई करण्यात आलेल्या जागेला बॅरिकेड्स, सावधानतेचे फलक लावले नाही.यामुळे पादचारी,दुचाकी किंवा अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावरील राडारोड्याचा आणि खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे अपघात घडण्याचा धोका संभवतो आहे.
काम करणाऱ्या ठेकेदाराने गर्दीच्या ठिकाणची विकासकामे वेगाने पूर्ण करण्याची गरज आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने संबधीत ठेकेदार कामात मनमानी कारभार करत आहेत. असा आरोप नागरिकांनी केला असून,रस्त्यालगत खोदाई करण्यात आलेले खड्डे भरावे आणि राडारोडा त्वरित उचलण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
०९ चाकण
वासुली फाटा येथे रस्त्यालगत खोदाई करून राडारोडा रस्त्यावर टाकला आहे.
090921\20210908_121057.jpg
???? - ?????? ???? ???? ?????????? ????? ???? ???????? ????????? ????? ???.