राडारोडय़ाचा शेजा:यांना धोका

By admin | Published: November 2, 2014 12:00 AM2014-11-02T00:00:38+5:302014-11-02T00:00:38+5:30

बंगळुरू-पुणो महामार्गावर न:हे गावात कोसळलेल्या इमारतीच्या आसपासच्या परिसरातील घरे जिल्हा प्रशासनाकडून आज रिकामी करण्यात आली.

Radar's shadow: The danger to them | राडारोडय़ाचा शेजा:यांना धोका

राडारोडय़ाचा शेजा:यांना धोका

Next
पुणो : बंगळुरू-पुणो महामार्गावर न:हे गावात कोसळलेल्या इमारतीच्या आसपासच्या परिसरातील घरे जिल्हा प्रशासनाकडून आज रिकामी करण्यात आली. तसेच, या इमारतीच्या मागे असलेली एक आइस्क्रीम फॅक्टरी आणि त्या लगत असलेली काही घरे पाडण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. कोसळलेल्या इमारतीचा राडारोडा काढताना, तो या घरांवर कोसळण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा उपाय म्हणून ही कारवाई  करण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी या इमारतीच्या पार्किगमध्ये अडकलेल्या संदीप मोहिते या तरुणाचा मृतदेह बाहेर काढल्या नंतर एनडीआरएफ आणि महापालिकेकडून सुरू असलेली राडारोडा काढण्याची मोहीम थांबविण्यात आली आहे.
 शुक्रवारी पहाटे न:हे-आंबेगाव येथील भूमकर मळामधील पितांबर कॉम्पलेक्स ही सहा मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आठ कुटुंबे वाचली असून, इमारत कोसळण्यापूर्वी पार्किगमधील गाडी काढण्यासाठी गेलेल्या संदीप मोहिते या युवकाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभर या इमारतीचा राडारोडा काढण्याचे काम महापालिका प्रशासन; तसेच एनडीआरएफकडून सुरू होते. मात्र, संदीपचा मृतदेह काढल्यानंतर, ते बंद करण्यात आले होते. आज सकाळी हे काम सुरू करण्यात आलेले नव्हते. या इमारतीचा राडारोडा आता खाली आला असून, या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या दोन मजली आइस्क्रीम फॅक्टरी आणि काही बांधकाम मजुरांच्या घरांवर पडण्याची शक्यता निर्माण झाली 
आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय 
म्हणून या घरांमधील नागरिकांना 
बाहेर काढण्यात आले असून, 
त्या ठिकाणची बैठी घरे 
पोलीस बंदोबस्तात पाडण्यात येत असल्याचे हवेलीचे तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तसेच, या इमारतीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला 
आहे. (प्रतिनिधी)
 
जागामालकास अटक व कोठडी
पुणो : न:हे-आंबेगाव येथील इमारत कोसळल्याप्रकरणी सदोष मनुष्य वधाच्या आरोपाखाली बांधकाम व्यावसायिकासह तिघांना पोलिसांनी अटक केली.  पोलिसांना बेकायदा बांधकामांचा तपास करायचा आहे. या तिघांना 6 नोव्हेंबर्पयत 
पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 
बांधकाम व्यावसायिक किशोर पितांबर वडनेरा (वय 48, रा. न:हे गाव), जागामालक रणजित संभाजी देसाई (वय 4क्, रा. सहकारनगर), कैलास कृष्णा कंक (वय 48, रा. बिबवेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सोपान गणपत जगताप (वय 56, रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. 
आरोपींनी संगनमत करून बांधकाम परवानगीपेक्षा अनधिकृत वाढीव बांधकाम केले होते. तसेच, कॉम्पलेक्सच्या मागील बाजूला तीन मजली अनधिकृत बेकायदेशीर बांधकाम करून, नगर रचना कार्यालयाने दिलल्या अटी व शर्तीचा भंग करून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न घेता, तीन सदनिका ग्राहकांना वास्तव्यासाठी विकल्या होत्या. तेथील रहिवाशांच्या जीवितास धोका असतानाही त्यांना घर विकल्याने सदोष मनुष्यवधाचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Radar's shadow: The danger to them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.