राजकारणात पश्चात्तापाला संधी नसते : राधाकृष्ण विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 03:19 PM2022-11-05T15:19:55+5:302022-11-05T15:20:10+5:30

मांडवगण फराटा येथे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत किसान क्रांती पॅनेलच्या सांगता सभेत पाटील बोलत होते...

Radhakrishna Vikhe Patil said There is no room for regret in politics ghodganga sugar factory election | राजकारणात पश्चात्तापाला संधी नसते : राधाकृष्ण विखे पाटील

राजकारणात पश्चात्तापाला संधी नसते : राधाकृष्ण विखे पाटील

Next

रांजणगाव सांडस (पुणे) : राजकारणात पश्चात्तापाला संधी नसते. ही कारखाना निवडणूक तुमच्या भवितव्याशी निगडित आहे. त्यामुळे पश्चात्तापाची वेळ येऊ देऊ नका, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. ते मांडवगण फराटा येथे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत किसान क्रांती पॅनेलच्या सांगता सभेत बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले, “सहकार चळवळीत चढ-उतार होत असतात. शेतकऱ्यांच्या मालकीची कारखाना हीच एकमेव संस्था आहे. येथेच शेतकरी अधिकाराने बोलू शकतो. खाजगी साखर कारखान्यात वॉचमन गेटवर शेतकरी वर्गाला थांबवत असतो; पण सहकारी साखर कारखान्यामध्ये तो सर्वत्र फिरत असतो. ९० टक्के साखर ही सहकारी साखर कारखान्यांत तयार होत असते. परंतु आता खाजगीकरणामुळे ४५ टक्के साखर तयार होते. सहकारी कारखानदारी आता अडचणीत आहे. ती टिकण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. इथेनॉल धोरण २० वर्षांपूर्वी यायला पाहिजे होते. तालुक्यात सहकाराच्या माध्यमातून दहशत पसरविली जात आहे. राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे; त्यामुळे न घाबरता घोडगंगात परिवर्तन करा, असे विखे पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई-

यावेळी शिवाजी आढळराव पाटील म्हणाले, “सात वर्षांपूर्वी आपण सर्वांनी घोडगंगात परिवर्तन करण्यासाठी पदयात्रा काढली होती. साखर कारखान्याच्या निवडणुकीत व इतर निवडणुकांत फरक आहे. कारखान्याचा विषय आपल्या चुलीशी निगडित आहे. शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. त्यामुळे न घाबरता सत्ता परिवर्तन करा. तुम्हाला जेथे अडचण येईल तेथे मदत करण्यासाठी आम्ही आहोत. ६ तारीख तुमच्या आयुष्याचे परिवर्तन करणारी आहे.”

...तर भविष्यात ऊस उत्पादक शेतकरी शिल्लक राहणार नाहीत-

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद म्हणाले, “ही निवडणूक सर्वांनी गांभीर्याने घावी. आता जर तुम्ही चुकला तर भविष्यात ऊस उत्पादक शेतकरी शिल्लक राहणार नाहीत. २५ वर्षांत चेअरमन अशोक पवार यांनी खूप काम केले आहे आता त्यांना आराम द्या. म्हणून आता तुम्ही परिवर्तनाला साथ द्या.”

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब भेगडे, आमदार राहुल कुल, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, निवृत्ती गवारी, दादा पाटील फराटे, सुधीर फराटे, ॲड. सुरेश पलांडे, बाळासाहेब घाडगे, पाराजी गावडे, भगवानराव शेळके, रामभाऊ सासवडे, गणेश भेगडे, राजेंद्र कोरेकर, आबासाहेब गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Radhakrishna Vikhe Patil said There is no room for regret in politics ghodganga sugar factory election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.