पुण्याची राधिका सकपाळ अजिंक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 02:57 AM2018-11-17T02:57:45+5:302018-11-17T02:58:10+5:30
राज्य टेबल टेनिस : नभा किरकोळे हिचे उपविजेतेपदावर समाधान
पुणे : महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेतर्फे (एमएसटीटीए) आयोजित ४९व्या आंतरजिल्हा आणि ८०व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या राधिका सकपाळ हिने शुक्रवारी १२ वर्षांखालील मुलींच्या गटातून विजेतेपद पटकावले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली. कॅडेट मुलींच्या अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित राधिकाने अव्वल मानांकित मुंबई उपनगरच्या सना डिसूझा हिला नमवून विजेतेपदाला गवसणी घातली. राधिकाने ही लढत १२-१०, ११-७, ११-५, ११-७ अशी जिंकली. मुलांच्या गटात मुंबई उपनगरचा अक्षत जैन विजेता ठरला. त्याने ठाण्याच्या गौरव पंचंगम याचा अंतिम फेरीत ११-९, ७-११, ११-४, ८-११, ११-९, ५-११, ११-२ अशा फरकाने पराभव केला. या गटात पुण्याच्या नील मुळ्येचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.
पुण्याची नभा किरकोळे हिला १० वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मिडजेट मुलींच्या गटात अव्वल मानांकन असलेली नभा दुसºया मानांकित अकोल्याच्या रिया कोठारीकडून ७-११, ११-१, ११-९, ११-३ ने पराभूत झाली. उपांत्य फेरीत नभा हिने ठाण्याच्या सुक्रती शर्माचे आवाहन ११-३, ११-७, ११-५ असे संपविले होते. रियाने काव्या भटला नमवून अंतिम फेरी गाठली होती. या गटात मुलांमध्ये नांदेडच्या कौस्तुभ गिरकावकरने विजेतेपद प्राप्त केले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद चौरे, मनोज सुरी यांच्या हस्ते झाले. या वेळी एमएसटीटीएचे अध्यक्ष राजीव बोडस, संयुक्त सचिव आणि स्पर्धा समितीचे अध्यक्ष यतीन टिपणीस, सरचिटणीस प्रकाश तुळपुळे, उपाध्यक्षा स्मिता बोडस, एमएसटीटीएच्या निवड समितीचे अध्यक्ष कमलेश मेहता, मानांकन समितीचे अध्यक्ष संजय
मोडक, एमएसटीटीए सदस्य नरेंद्र छाजेड, रायगड जिल्हा संघटनेचे
संजय कडू, स्पर्धा संयोजन सचिव श्रीराम कोनकर, श्रीकांत अंतुरकर, आशिष बोडस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
निकाल : एकेरी
१० वर्षांखालील मुले : उपांत्य फेरी : वरद लोहाट (परभणी) विवि मयुरेश सावंत ११-७, ११-४, ६-११, १३-११. कौस्तुभ गिरगावकर (नांदेड) विवि रामानुज जाधव (पुणे) ११-३, ११-७, ११-९. अंतिम फेरी : कौस्तुभ गिरगावकर (नांदेड) विवि वरद लोहाट (परभणी) ११-५, ११-६, ११-६.
१० वर्षांखालील मुली : उपांत्य फेरी : नभा किरकोळे (पुणे) विवि सुक्रती शर्मा (ठाणे) ११-३, ११-७, ११-५. रिया कोठारी (अकोला) विवि काव्या भट (ठाणे) ११-७, ११-६, ११-७.
अंतिम फेरी : रिया कोठारी (अकोला) नभा किरकोळे (पुणे) ७-११, ११-१, ११-९, ११-३.
१२ वर्षांखालील मुले : उपांत्य फेरी : गौरव पंचंगम (ठाणे) विवि कौशल चोपडा (नाशिक) ८-११, १३-११, ११-८, १३-११, १३-१५, ७-११, ११-७. अक्षत जैन (मुंबई उपनगर) विवि नील मुळ्ये (पुणे) ११-९, १४-१२, १२-१४, ७-११, ११-६, ९-११, ११-६.
अंतिम फेरी : अक्षत जैन (मुंबई उपनगर) विवि गौरव पंचंगम (ठाणे) ११-९, ७-११, ११-४, ८-११, ११-९, ५-११, ११-२.
१२ वर्षांखालील मुली : उपांत्य फेरी : सना डिसुझा (मुंबई उपनगर) विवि केशा झव्हेरी
(मुंबई शहर) ११-६, ११-९, १४-१६, ११-४, ११-९. राधिका सकपाळ (पुणे) विवि सायली बक्षी (नाशिक) ११-८, ११-९, ९-११, ११-१, ११-८.
अंतिम फेरी : राधिका सकपाळ (पुणे) सना डिसूझा (मुंबई उपनगर) १२-१०, ११-७, ११-५, ११-७.